• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोपरल्ली माल येथील बंद सोलर पंप योजना तातडीने सुरू करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 10, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प; पाच दिवसांत दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी

मुलचेरा : प्रतिनिधी

RelatedPosts

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

नगरपंचायत मुलचेरा अंतर्गत मौजा कोपरल्ली माल येथील प्रभाग क्रमांक १५ मधील सोलर ड्युअल पंपवर कार्यान्वित असलेली नळपाणीपुरवठा योजना मागील तीन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबत नगरपंचायत प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही अद्याप आवश्यक दुरुस्ती करण्यात आली नसल्याचा आरोप निवेदकांनी केला आहे.

मे महिन्यापासून सदर नळपाणीपुरवठा योजना बंद असल्याने विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या शेतीच्या कामांना सुरुवात झाली असून, त्यातच पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. वारंवार सूचना करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

बंद पडलेली नळयोजना सुरू करण्याबरोबरच तुटलेले स्टँड पोस्ट दुरुस्त करणे, नवीन प्लॅटफॉर्म तयार करणे, पाण्याची टाकी स्वच्छ करणे, नवीन फिल्टर बसविणे तसेच नादुरुस्त मोटरची दुरुस्ती करणे आदी कामे तातडीने करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर सर्व कामे येत्या पाच दिवसांत पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. विहित मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास महिला व नागरिकांच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर प्रशासनाच्या निषेधार्थ ‘घागर मोर्चा’ काढण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याबाबत नगरपंचायत अध्यक्ष, तहसीलदार तथा तालुका न्यायदंडाधिकारी तसेच नगरपंचायतीचे सभापती व सर्व नगरसेवक यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

निवेदनावर प्रमोद गोटेवार, मुरलीधर ओडेंगवार, अंकुश गोंगले, ध्रुप दिवटीवार आणि एकनाथ गरतुळवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाची तारीख १० सप्टेंबर २०२६ असून, कोपरल्ली माल येथील पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.

Previous Post

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

Next Post

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

Related Posts

Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
0
Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
7
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
2
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
0
Blog

चामोर्शीत आज भव्य तान्हापोळा उत्सव; ‘चामोर्शी रत्न पुरस्कार’ ठरणार मुख्य आकर्षण

September 10, 2026
2
Blog

धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; आमदार तानाजी सावंत यांचे शासनाकडे निवेदन

September 10, 2026
3
Next Post

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

ताज्या बातम्या

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In