• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; आमदार तानाजी सावंत यांचे शासनाकडे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 10, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान; विशेष सर्वेक्षण व पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी

वाशी : प्रतिनिधी

RelatedPosts

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

धाराशिव जिल्ह्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, जिल्ह्यात तातडीने विशेष सर्वेक्षण व पंचनामे करून परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी शासनाकडे केली आहे.

माजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री असलेल्या आमदार सावंत यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पिकांची वाढ समाधानकारक झालेली नाही. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस तसेच इतर खरीप पिकांवर पावसाच्या कमतरतेचा गंभीर परिणाम झाला असून काही भागांत पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर उत्पादन खर्च वसूल करण्याचेही संकट उभे राहिले आहे.

निवेदनात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा व पाणी, भूजल पातळी आणि ग्रामीण भागातील रोजगाराच्या प्रश्नांकडेही शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. पावसाचे प्रमाण, पिकांची प्रत्यक्ष स्थिती, जमिनीतील ओलावा, जलसाठे, भूजल पातळी, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती यांचा सर्वंकष विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दुष्काळ जाहीर केल्यानंतर उपाययोजनांची मागणी

आमदार सावंत यांनी शासनाकडे शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये पीक नुकसानभरपाई व दुष्काळी अनुदान तातडीने देणे, खरीप पिकांचे पंचनामे करून प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे मदत देणे, पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती देऊन कर्जाचे पुनर्गठन करणे आणि पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी विशेष कार्यवाही करणे यांचा समावेश आहे.

पिण्याच्या पाण्याची समस्या असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करून चारा व पाण्याची व्यवस्था करावी, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगा व इतर रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत अथवा स्थगिती द्यावी, पुढील हंगामासाठी बियाणे, खते व इतर आवश्यक कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात आणि धाराशिव जिल्ह्यासाठी परिस्थितीच्या गांभीर्यानुसार विशेष दुष्काळी आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत असून परिस्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वी शासनाने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक निकषांच्या आधारे कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकरी व ग्रामीण जनतेला तातडीने आर्थिक व प्रशासकीय मदत उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केली आहे.

Previous Post

मालेगाव शहरात वारंवार वीज खंडित; नागरिक त्रस्त

Next Post

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

Related Posts

Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
0
Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
7
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
2
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
0
Blog

कोपरल्ली माल येथील बंद सोलर पंप योजना तातडीने सुरू करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा

September 10, 2026
4
Blog

चामोर्शीत आज भव्य तान्हापोळा उत्सव; ‘चामोर्शी रत्न पुरस्कार’ ठरणार मुख्य आकर्षण

September 10, 2026
2
Next Post

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

ताज्या बातम्या

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In