प्रतिनिधी -दरिकांत कोळेकर.
कुरुंदवाड :-येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत मा. पोलीस अधीक्षकसो कोल्हापूर यांचे आदेशानुसार आगामी होणाऱ्या गणेशोत्सव सणाच्या निमित्याने कोणताही अनुचित प्रकार किंवा घटना घडू नये. यासाठी कुरुंदवाड शहरामधून महाराणा प्रताप चौक – सन्मित्र – नवभाग रोड – ईगल चौक – महात्मा बसवेश्वर चौक – दर्गा चौक – नगरपालिका चौक, बागवान मशीद व मिश्र लोकसंख्या असणाऱ्या परिसरात *पोलीस संचलनाचे आयोजन गुरुवार दिनांक 10/09/2026 रोजी दुपारी 13.00 ते 14.30 वा. दरम्यान आठवडी बाजार दिवशी *दंगल काबू योजना रंगीत तालीम* राबविण्यात आली.
त्यानुसार कुरुंदवाड शहरामधून महाराणा प्रताप चौक – सन्मित्र – नवभाग रोड – ईगल चौक – महात्मा बसवेश्वर चौक – दर्गा चौक – नगरपालिका चौक, बागवान मशीद व मिश्र लोकसंख्या असणाऱ्या परिसरात पोलीस संचलन करण्यात आले. सदर रूट मार्च करिता कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड.पोलीस निरीक्षक जीवन पाटील, पोलीस अधिकारी असे 2 पोलीस अधिकारी तसेच 15 पोलिस अंमलदार, 15 होमगार्ड, RCP प्लाटून (1+15) या दंगल काबू पथ पोलीस संचलन रंगीत तालीम मध्ये उपस्थित होते.
यावेळी शहरातून रूट मार्च काढत असताना शहरातील नागरिकांना भयमुक्त, शांततेत सण साजरा व्हावा, कोणतेही अनुचित प्रकार घडू नये. अथवा दंगल घडू नये अशावेळी कोण – कोणत्या बाबींची दक्षता घ्यावी, अथवा अशी दंगल काबू कशी करावी याकरिता कोणती दक्षता घ्यावी या बाबत रंगीत तालीमद्वारे दर्शन कुरुंदवाड नागरिकांना करून दाखविण्यात आले.









