गणेशोत्सवाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व, समाजप्रबोधन आणि भारतीय संस्कृतीच्या जतनावर केले मार्गदर्शन
प्रतिनिधी :
!! जय जय रघुवीर समर्थ !!
गणेश चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त अमेरिकेत (USA) वास्तव्यास असलेल्या सौ. चित्राताई यांनी महंत श्री अरविंदनाथजी महाराज यांची विशेष मुलाखत घेतली.
या विशेष मुलाखतीदरम्यान महंत श्री अरविंदनाथजी महाराज यांनी गणेशोत्सवाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व, समाजप्रबोधन, भारतीय संस्कृतीचे जतन तसेच अध्यात्माच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा देण्याची गरज याबाबत सविस्तर विचार व्यक्त केले.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील एकोपा, संस्कार आणि सामाजिक जागृतीला चालना देणारा उत्सव ठरावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. भारतीय संस्कृतीतील परंपरा आणि मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उत्सवांचे महत्त्व अधोरेखित केले.
अध्यात्माच्या माध्यमातून व्यक्तीमध्ये सकारात्मक विचार, सद्भावना आणि सामाजिक बांधिलकी निर्माण होऊ शकते. त्यामुळे अध्यात्म आणि समाजप्रबोधन यांची सांगड घालून समाजाला योग्य दिशा देण्याची आवश्यकता असल्याचेही महंत श्री अरविंदनाथजी महाराज यांनी यावेळी सांगितले.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घेण्यात आलेली ही विशेष मुलाखत भक्तांसह समाजप्रबोधनाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरली.









