भारतीय बौद्ध महासभेच्या नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड; तरुण कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या
वाशी प्रतिनिधी :
वाशी : भारतीय बौद्ध महासभा अर्थात दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया, शाखा धाराशिव (उत्तर) अंतर्गत वाशी तालुका शाखेचे दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी पुनर्गठन करण्यात आले. यावेळी तेरखेडा येथील शुभम सुभाष सरवदे यांची तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीत सरचिटणीसपदी अॅड. महादेव भारत कांबळे, कोषाध्यक्षपदी अॅड. सुजित माणिक हजारे, तालुका महिला अध्यक्षा म्हणून तेरखेड येथील अॅड. धनश्री राजेंद्र मगर, समता सैनिक दलाच्या उपाध्यक्षपदी प्रशिक सुरेंद्र गायकवाड यांची निवड करण्यात आली.
तसेच प्रसार व पर्यटन अध्यक्षपदी अॅड. संदेश बाबासाहेब पारडे, प्रसार व पर्यटन सचिवपदी अॅड. सुरज गौतम गायकवाड, पर्यटन विभाग संघटकपदी तेरखेडा येथील अजय विनोद साळवे, तर संस्कार विभाग संघटकपदी पारा येथील उद्धव सोपान शिंगारे यांची नियुक्ती करण्यात आली.
या पुनर्गठन कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष एल. आर. धावारे गुरुजी, महिला अध्यक्षा शामलताई कांबळे, महिला सचिव कोमलताई सर्वदे, कळंब तालुका अध्यक्ष शीलवंत गुरुजी, मार्गदर्शक एस. एम. कांबळे गुरुजी तसेच माजी जिल्हाध्यक्ष अॅड. हनुमंत चंद्रभान प्रतापे (घारगाव) यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित कार्यकारिणीत मोठ्या संख्येने तरुणांना जबाबदाऱ्या देण्यात आल्याने संघटनेच्या कामाला नव्या पिढीचा सहभाग मिळणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
महाराष्ट्रातील अत्यंत तरुण तालुका कार्यकारिणी म्हणून वाशी तालुका शाखेच्या नूतन कार्यकारिणीकडे पाहिले जात असल्याचे मत जिल्हा सरचिटणीस अॅड. दिलीप निकाळजे यांनी व्यक्त केले.








