• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माहूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 23, 2026
in Blog
0
माहूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

तहसीलदारांमार्फत राज्य सरकारला निवेदन; एकरी एक लाखांची मदत, सरसकट पंचनामे व कर्जमाफीची मागणी

माहूर : मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात पावसाने मोठा खंड दिल्याने शेतीसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करत, माहूर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत राज्य शासनाकडे निवेदन साद करण्यात आले.

माहूर परिसरात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी यांसह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यासह विविध उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

RelatedPosts

लातूर जिल्ह्यात हेल्मेटसक्तीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे विशेष लक्ष

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

एकरी एक लाख रुपयांची मदत देण्याची मागणी

काँग्रेसच्या वतीने पिकांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना प्रति एकर एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त क्षेत्राचे सरसकट पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.

कर्जमाफी व वीजबिल माफीची मागणी

शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट लक्षात घेता संपूर्ण कृषी कर्जमाफी करण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. खरीप हंगामातील नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली.

दरम्यान, राज्यातील विविध भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. शासनाकडूनही परिस्थितीचा आढावा घेऊन मदतीबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे अलीकडील वृत्तांतून समोर आले आहे.

यावेळी काँग्रेसचे माहूर तालुका अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, ज्येष्ठ काँग्रेस नेते मोहन राठोड, तालुका सरचिटणीस सैय्यद अली सैय्यद अब्दुल, माजी उपनगराध्यक्षा सौ. अश्विनी आनंद पाटील तुपदाळे, नगरसेविका लतीफा बी. शेख मस्तान, नगरसेविका सौ. कविताताई राजू सौंदलकर, नगरसेवक प्रतिनिधी तथा काँग्रेस नेते निसार कुरेशी, नगरसेवक प्रतिनिधी तथा तालुका समन्वयक राजू एकनाथ सौंदलकर, काँग्रेस नेते सय्यद ईसा सय्यद खाजा, शहराध्यक्ष शेख सादिक शेख मुस्सा, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बेहेरे, तालुका उपाध्यक्ष माधवराव मुंडे, तालुका महासचिव अहेमद कुरेशी, संदीप दादाराव सुकळकर, जगदीश पाटील तुपदाळे, शेख रफिक शेख महेबूब, गंगाधर शंकर फड, सुशीलकुमार ताक, गुरुदास राजू चव्हाण, सौ. सरस्वती विशाल पाटील तुपदाळे, इंदिरा सुभाष पांडे, शहर कार्याध्यक्ष शरीफ शेख महेबूब यांच्यासह तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माहूर तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केलेल्या या मागण्यांवर शासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद

Next Post

तिवसा गावातील पहिला सार्वजनिक गणपती चा इतिहास.– प्रा.डाॅ.रवी दलाल.

Related Posts

Blog

लातूर जिल्ह्यात हेल्मेटसक्तीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे विशेष लक्ष

September 23, 2026
1
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
Blog

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

September 23, 2026
1
उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे
Blog

उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

September 23, 2026
12
शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न
Blog

शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

September 23, 2026
7
मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या

September 23, 2026
1
महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी
Blog

महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

September 23, 2026
10
Next Post

तिवसा गावातील पहिला सार्वजनिक गणपती चा इतिहास.-- प्रा.डाॅ.रवी दलाल.

ताज्या बातम्या

लातूर जिल्ह्यात हेल्मेटसक्तीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे विशेष लक्ष

September 23, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

September 23, 2026
उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In