• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तिवसा गावातील पहिला सार्वजनिक गणपती चा इतिहास.– प्रा.डाॅ.रवी दलाल.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 23, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्याचे ठिकाण.या गावाला कोैतुक संस्कृतीचा कोणताच वारसा नाही‌. इथे ना टोले जंग ईमारती आहेत, ना मोठी बाजारपेठ आहे.ना भव्य पुरातन राजवाडे आहेत. तिवसा म्हणजे दाट लोकवस्तीच फार मोठे गाव आमच्या गावासाठी खुप जनी म्हण आहे. निंभोरा – डेहणी अंतर हाताच..सातरगाव साताचं..तिवसा होय भुताच.!!
हा म्हण जून्या लोकांच्या तोंडून खुप प्रसिद्ध झाला होता. तिवस्याचा मुख्य नकाशा नजरे पुढें आणला तर पिंगळेच्या काठावर एक पागे,टिनाचे जुने बस स्टाॅप मागे पिंगळा नदीच्या काठावर उंच ओटावर पांढरे माता मायचे देऊळ, रोडवर आलं कि समोरच्या बाजुला दयानंद महाराज चे आलुबोंडे भज्याचे हाॅटेल,अगदी पुढे सरकारी जुना दवाखाना जून्या बस स्टँडला लागून भिक्खुलाल मारवाडयाने वाटसरूसाठी दोन कमानीचा मुसाफिर खाना बांधलेला होता.तो काळ्या दगडाचा मुसाफिरखाना 1979 साली रोड रुंदीकरणासाठी पाडण्यात आला.त्यावेळी कुरेमरसिंग शिख डुक्कर घेवून मुसाफिर खान्यात राहायचा.आता तिथे हायवे रोड आहे.पण मुसाफिर खान्यातील विहिर शाबुत मात्र आहे. आता ती विहीर सरकारी दवाखान्याच्या आवारात येते.बाजुला टिपलेची मराठा खनावळ,असं आमचं जुन बस‌ स्टाॅप म्हणजे गावातील एकमेव वर्दळीचं ठिकाण होतं.

RelatedPosts

लातूर जिल्ह्यात हेल्मेटसक्तीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे विशेष लक्ष

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

काळ्या दगड कमानीत बांधलेल्या इंग्रजकालीन पुलाखाली माणसाची हागणदारी आजही आहे. आता नव्या विस्तारात तिवस्याचा चेहरामोहरा पार बदलुन गेला पण जुन्या बसस्टाॅपला लागुन असलेला इंग्रजकालीन पुल हजारो वर्षांपासून दारींद्र पोटात घेवुन वाहणारी पिगंळानदी गटारनाला झाली.पण आमचं तिवसा पिंगळेच्या काठावर वसलेलं एक समृध्द गाव आहे.यात शंका नाहीं. तसा तिवस्याचा पसारा खुप मोठा आहे.पेट पुरा, कुणबी पुरा,पाटील पुरा,
देशमुख पुरा धनगर पुरा, महार पुरा,भोई पुरा, चाभांर पुरा,मांग पुरा,आणि पोलिस ठाण्याच्या मागे शेवटी पारधी पुरा या पुरातन लोकवस्त्या म्हणजेच मुळ तिवसागाव.जातीगत पेठांचा उल्लेख मी द्वेषभावनेतुन केला नाही. तर हे पुरे आणि पेठांच तिवस्याच गाव समावलेलं आहे.या जुण्या लोकवस्तींच आमच्या गावाचा जीव की प्राण तिवस्याला याच पेठानी विकसीत केलं,गाव पण दिल.म्हणुन या जुन्या गावपेठाच तिवसा गावाची खरी ओळख आहे.


आपण आज तिवसा गावातील पहिल्या गणपतीची चर्चा करणार आहोत.माझ्या साहित्यात आज पर्यंत मी कुठेही देव धर्माचा उल्लेख केलेला नाही.देव ईश्वर गणपती हे मी प्रकार मानत नाही. पण “आठवणीचे दिवस” हे पुस्तक लिहितांना गावातील अनेक घडामोडीचा उल्लेख केला.तसा गणपती उत्सव पण एक माझ्या आठवणीतील भाग आहे. तर दुर्गा उत्सव 1757 साली कलकत्ता शहरातुन
सुरु झाला.गणेश उत्सव पुणे शहरातुन भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 साली सुरु केला. तर रावण दहणाची कुप्रथा नागपुर मधुन 1952 साली सुरु झाली आणि तिवसा गावात गणपती उत्सवाची सुरुवात 1939 साला पासुन सुरु झाली. 1939-40 च्या आधी तिवस्यात कुठेही सार्वजनिक गणपती बसविण्यात आलेला नव्हता आणि ही सार्वजनिक गणपतीची सुरुवात आमच्या भोई पुऱ्यातुन सुरु झाली.
भारत इंग्रजाच्या गुलामीत असतानांच भोई पुऱ्यातील काही तरुणांनी एकत्र येवुन 1939-40 साली नथ्थुजी सुरजुसेच्या घरी मातीचा उभा गणपती तीन दिवसा करीता बसविला.त्यानंतर काही कारणास्तव तोच उचलुन भोई पुऱ्यातील नेमाडेंच्या घरापुढं ओटयावर बसविण्यात आला.हा इंग्रज राजवटीचा कालखंड होता.म्हणून तिवसा गावात पहिल्यादा सार्वजनिक गणपती बसविण्याचा मान भोई पुऱ्याचाच आहे.


ज्या तरुणांनी 1939 साली पहिल्यादा गणपती बसविला त्या तरुणांची नावे पाहुयात.नथ्थुजी लाडंगे,नारायणआप्पा लांडगे,उंकडाराव मोरे,शंकर सुरजुसे, विश्वनाथ नेमाडे,लक्ष्मण सुरजुसे,महादेव दखने,शामराव लोणारे किसना लेवटे,नामदेव सुरजुसे,मोतीराम सपकाळ,प्रल्लाद अव्हाड,
भिमराव सपकाळ प्रल्हाद मोरे,महादेव बावने आदींनी 1939 साली भाेई पुऱ्यात पहिल्यांदा गणपती बसविणाची प्रथा सुरु केली.पहिल्या पिढीतील या सदस्यांपैकी आता कुणी जिवंत नाहीत.काही वर्षे म्हणजे तीन वर्ष मातीचा गणपती बसविला नंतर पहिला गणपती बारा रुपयात बसला आणि बारा रुपया पासुन सुरु झालेला गणपती आता लाखांच्या घरात गेला.तेव्हा पण चौकाचे नाव भोईपुरा होते.तेव्हा भोईपुऱ्यात घरोघरी गधे असायचे.घर बांधकाम इतर कामांसाठी फक्त गध्यांचा उपयोग जास्त व्हायचा म्हणून गावात गध्यांची भरमार होती.तर भोईपुऱ्यात भाजल्या मासोळ्या, खेकडे,झिंगे,शुक्रवार मंगळवार हमखास मिळायचे.म्हणून भोईपुरा हे आमचं छोट मार्केटचं होतं.आजुबाजुला महारपुरा,मांगपुरा, चांभारपुरा,एकमेकात गुतंलेले मोहल्ले आहेत. गणपती बसतो ती खाली जागा म्हणजे भोईपुरा.

100 वर्षा पासुन सर्व समाज एकत्र गुण्या-गोविंदाने नांदताे. मोहल्यातील खाली जागेत टिन टप्पर, डेही फाटे, चादरी,धोतर बांधुन कापडी तंबोरा उभारला आणि उभा गणपती बसविण्याची पंरपरा पहिल्या पिढीने सुरु केली. त्यानंतर हा उत्सव दुसऱ्या पिढीने सांभाळला. यामध्ये प्रामुख्याने नामदेव सुरटकार ,रमेश लाडंगे, रामराव सुरटकार,बाबाराव सुरटकार हे दुसऱ्या पिढीतील काही सदस्यांची नावे आहेत.यानंतर तिसऱ्या पिढीने गणपती वारसा पुढे नेला यामध्ये प्रामुख्याने महादेव गारपवार अंरविद पंतगरा‌य,दत्ता सुरटकार,श्रावन वाघाडे,
राजु लेवटे,श्रावण सपकाळ,शंकर सपकाळ,
शरद सुरजुसे, पुरुषोत्तम सुरजुसे,विजय लाडंगे, जानराव नेमाडे,भिमराव नेमाडे,या तरुणांनी गणपती बसवुन सामाजिकदृष्ट्या राजकीय प्रश्राकडे कल ठेवला. आणि याच पिढीत भाेईपुऱ्याचे नाव शिवाजी चौक झाले.मग चौकातील गणपतीला शिवाजी मंडळ गणपती असा ऊल्लेख होवु लागला. शिवाजी चौक हे नाव 1985-90 च्या दशकात तिसऱ्या पिढी कडुन देण्यात आले.1990 च्या सुमारात गणपती मनोरंजनाचा उत्सव एकदम शिगेला पोहचला़ होता.तेव्हा मनोरंजनाची माध्यमे खुप कमी होती.म्हणुन गणपती जवळ दहा दिवस झुबंळ असायची.
महिला मंडळी शेतातुन काम आटपुन लवकर घरी यायच्या.तर दिवस बुडल्या पासुन तर आरती होईपर्यत लहान पोरांच्या गणपती जवळ चकरा सुरु व्हायच्या. कामाचा पसारा आटपुन‌ प्रोगाम सुरु व्हायच्या.आधी मोक्याची जागा शिपण्यासाठी फार कसरत करावी लागे.त्यात टवाळकी करणारे पोट्टे, मांगपुरा,महापुरा,भोई पुऱ्याच्या काठा काठाने उभे होवून आंनद भोगायचे.


नानासाहेब यावले, सदाशीव सोनोने,सुखदेव दादा यांच्या नकलाचा प्रोगाम तर कधी मोहल्यातील मुला मुलींचे रेकाॅडीग डाॅन्स,गीत गायन स्पर्धा कधी कव्वालीचा कार्यक्रम,रमेश ठाकरेंचा वऱ्हाडी झटका तर कधी सत्यपाल महाराजाचे किर्तन,खंडारे महाराजांचे किर्तन,महादेव मसालेवाले महाराजांचा डिंडोरा आदी कार्यक्रम असायचे.दहा दिवस आंनदात निघायचे. तर व्हिडीओ, VCR लावुन चित्रपट पाहण्याची मज्जा वेगळीच असायची. किवा छोट्या परदयावर अमिताभ बच्चनचे चित्रपट पाहण्याची मज्जा या दहा दिवसात व्हायची. आज कोणता सिनेमा आहे याची सुचना राघो मामा गावभर फिरुन दंवडी पिटायचा.सन 1985 पासुन 2023 पर्यंत आसानाधीन बसलेला गणपती मी भोईपुऱ्यात पाहिला नाही. दर वर्षी शिवाजी चोैकातील गणपती उभाच राहायचा.कधी पुथ्वीवर तर कधी टेकडीवर,मोरावर कधी डंमरुवर वराहाच्या सिंगावर कधी तळहातावर तर कधी शंकराच्या डबरु वर उभा असलेलाच गणपती बघितले आहे.बैठक विराजमान गणपती मी पाहिला नाही.पण यंदा 2026 साली चौथ्या पिढीने 86 व्या वर्षी उभा गणपती बसविला.


पुर्वी गणपतीच्या स्थापनाच्या दुसऱ्या दिवसांपासुन मंडपात रंगरगोटी सजावट सुरु व्हायची‌.पेटंर नेमाडे, राजेद्र सोनोने बोलके चित्र काढुन गणपतीची सजावट करायचे तेव्हा मंडप‌ डेकोरेशन रामभाऊ बाखडे याचे असायचे. याच कालखंडात भोईपुऱ्यात मार्क्सवादाने उंचडी मारली अनेक तरुण कम्युनिष्ट पक्षाच्या डाव्या विचाराने प्रभावित झाले.रोडवर धरणे आंदोलनाचे युग याच कालंखडात सुरु झाले. 1980-1990 च्या दशकात मार्क्सवादाने प्रेरित तरुणांनी लाल बावटा उचलुन धरला. आणि राजकिय सामाजिक धार्मिक तिखट हालचाली सुरु केल्या.मार्क्स,लेनिनची निरईश्वरवादी विचारधारा घरा -घरात चुली पर्यत पोहचविली पण देवघरातुन देव काढु शकले नाहीत. मार्क्सवादाच्या नावाखाली यांनी अंधश्रध्देला प्रोत्साहीत केले असे म्हणावे लागेल‌. धार्मिकतेची किड जोपासत राहिल्याने शिवाजी चौकातील शैक्षणिक विकास थाबंला.

परिणाम आज शिवाजी चौकातील तरुण उच्च‌अधिकारी तर नाहीच पण सरकारी नौकरीत कारकुन देखील नाहीत‌. एक दोन अपवाद आहेत.मार्क्सवादयांनी सर्व जाती धर्मातील तरुणांना एकत्र करुन रोडवर आंदोलन मजबुत केले पण अंध धार्मिकतेला कधीच हात घातला नाही. उलट मार्क्सवादयांनी गणपती उत्सवातुन धार्मिकता जोपासुन मोठी केली.तरुणाईला आदोलंनात ओढले पण शैक्षणिक महत्व समजुन देण्यात अपयशी ठरले.हा चिंतनाचा भाग आहे. तिवसा गावात बरेच सार्वजनीक गणपती मंडळ आहेत पण ते हंगामी उत्सव साजरा करतात मग अविरत अभ्यास करुन शैक्षणिकता जोपासतात आणि सरकारी नौकरी हस्तगत करतात पण शिवाजी चौकात आजही शिक्षणातुन प्रगती झाली नाही.नव्या पिढीत शिक्षणाचा अभाव दिसुन येतो आहे.जुन्या पिढीतील सुरेद्र लेवटे हेच पोलिस अधिकारी पदापर्यत पोहचले.पण इतर तरुणांनी कष्ट घेतले नाही आता शंकराची मुर्ती बसवून श्रावण महिन्यात कावड यात्रा पण सुरु झाली आहे.


तसे तिवसा गावात अनेक‌ गणपती मंडळ आहेत
शारदा चौक गणपती मंडळ- होळकर चौक गणपती मंडळ -शिक्षक काॅलनी गणपती मंडळ आझाद चौक गणपती मंडळ न्यु क्रांती गणपती मंडळ, पेठपुरा गणपती मंडळ आहेत पण या मंडळाची सुरुवात खुप मागाहुन झाली पण शिवाजी चोैकातील गणपती हाच तिवस्यातील पहिला सार्वजनिक गणपती होय 1990-91 मध्ये आझाद हिंद मंडळाच्या गणपती खाली माझा मित्र जनार्दन लेवटे गणपतीची पाटी काढताना गणपती खालीच दबुन मरण पावला होता. त्यावर्षी पासुनच आझाद मंडळाने गणपती बसविणे बंद केले होते.


आता शिवाजी चौकात गणपती बसविणारी चौथी पिढी सुरू आहे़.पण पुर्वी सारखा उत्साह दिसत नाही.आता दहा दिवसांपैकी एकही दिवस मनोरंजन कार्यक्रम होत नाहीत.आता मोबाईल Watsapp पुढे गणपतीचा रंग फिक्का पडला आहे. ब्राम्हण समाज दिड दिवसांचा गणपती बसवुन मोकळे होतात.आणि शैक्षणिक कामाला लागतात.पण आम्ही बहुजन लोक दहा दिवस फुकट खर्ची घालतो.आणि कधीच अभ्यासाला लागत नाही. उलट हाडपख्या गणपती ,दुर्गा देवी शारदा देवी उत्सवाच्या तयारीला लागतो.मागे मी तिवस्यात गेलो तेव्हा देवराव बावणे च्या घराच्या कोपऱ्यात उंच सिमेंट ओट्याचे बाधंकाम झालेले दिसले. मला वाटले इथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसेल. पुन्हा तीन महिण्या नंतर गावात‌ गेलो तर ओट्यावर शंकराची मुर्ती बसविलेली दिसली हे पाहुन मनाला खुप वेदना झाल्या कारण शिवाजी चौकात शिवाजी महाराजाचा पुतळा उभारने आवश्यक होते.असो पण तिवस्यात सार्वजनिक गणपती ऊत्सवाची सुरुवात भोई पुऱ्यातुन 1939 साली सुरु झाली हे विशेष.

हा इतिहास समोरच्या पिढीला माहीत असावं म्हणुन गणपती उत्सवा विषयी माहीती लिहिली आहे.15 वर्षा नंतर शिवाजी चौकातील गणपती शताब्दी पुर्ण करेल.म्हणजे 100 वर्ष पुर्ण करेल त्यावेळी गणपती कार्यक्रमाची धुरा तेव्हा पाचव्या पिढीकडे असेल पण जोपर्यंत शिवाजी चौक हे नाव कायम राहायला पाहिजे. नाहीतर शंकरजीच्या मुर्तीचा आदर्श समोर ठेवून शिवाजी चौकाच रुपांतर शिवनगर मध्ये व्हायला नको.येत्या 20 वर्षानंतर शिवाजी चौकाचे नाव शिवनगर होवु नये.


यावर्षी तिवसा गावात शिवाजी चौकातील म्हणजे भोईपुऱ्यातील गणपती उत्सवला 86 वर्षे पूर्ण झाली आहेत हे विशेष आहे. 86 वर्षांच्या कालखंडात एकदाही बैठक विराजमान गणपती बसविलेला नाही.
मागील 86 वर्षा पासून भोईपुऱ्यात उभाच गणपती बसविण्यात येतो.
यावर्षी उंदराच्या खांद्यावर गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.

प्रा.डाॅ.रवी दलाल. तिवसा.(आठवणीतले दिवस पुस्तकातुन)
संकलन – अविनाश गोंडाणे अमरावती

Tags: Avinash Gondane
Previous Post

माहूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

Next Post

खामखेड्यात अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता

Related Posts

Blog

लातूर जिल्ह्यात हेल्मेटसक्तीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे विशेष लक्ष

September 23, 2026
0
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
Blog

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

September 23, 2026
0
उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे
Blog

उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

September 23, 2026
12
शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न
Blog

शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

September 23, 2026
7
मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या

September 23, 2026
1
महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी
Blog

महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

September 23, 2026
9
Next Post
खामखेड्यात अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता

खामखेड्यात अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता

ताज्या बातम्या

लातूर जिल्ह्यात हेल्मेटसक्तीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे विशेष लक्ष

September 23, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

September 23, 2026
उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In