• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लोणावळा शहर पोलीस सज्ज

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 24, 2026
in Blog
0
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लोणावळा शहर पोलीस सज्ज
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

६ पोलीस अधिकारी, ८५ कर्मचारी तैनात; डीजे, लेझर लाईटला निर्बंध, गुलालाची उधळण टाळण्याचे आवाहन

लोणावळा : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लोणावळा शहर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मिरवणूक शांततेत, शिस्तीत आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवत पार पडावी, यासाठी शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

RelatedPosts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

यंदा लोणावळा शहरातील २१ गणेश मंडळे पारंपरिक पद्धतीने क्रमाने विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मानाच्या गणपतीसह विविध मंडळांच्या मिरवणुकीसाठी वेळेचे नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक मंडळासोबत पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. दोन गणेश मंडळांमध्ये आवश्यक अंतर राखण्याची दक्षताही पोलिसांकडून घेतली जाणार आहे.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ६ पोलीस अधिकारी आणि सुमारे ८५ पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मिरवणुकीत डीजे, लेझर लाईट तसेच मोठ्या आवाजाच्या ध्वनिव्यवस्थेवर निर्बंध ठेवण्यात आले आहेत. गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून मिरवणूक शांततेत पार पाडावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गुलालाची उधळण टाळण्याचे आवाहन

मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करणाऱ्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी बैठक घेतली. यंदा गुलालाची उधळण टाळून इतर गणेश मंडळांसमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.

स्वागत कमानी हटविण्याच्या सूचना

विसर्जन मिरवणुकीतील ट्रॉली व सजावटीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी विसर्जन मार्गावरील स्वागत कमानी हटविण्याच्या सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत. तसेच राजकीय पक्षांनी स्वतंत्र स्वागत कक्ष उभारण्याऐवजी एकत्रित स्वरूपात स्वागत कक्ष उभारावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मिरवणुकीदरम्यान विविध चौकांमध्ये स्वागत कक्ष तसेच ढोल-ताशा पथकांसाठी नियोजन करण्यात आले आहे. मंडळांनी ठरवून दिलेल्या वेळेनुसार संबंधित चौकात प्रवेश करावा, जेणेकरून संपूर्ण मिरवणूक वेळेत पूर्ण करता येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

लोणावळा नगरपरिषदेच्या विसर्जन घाटावर प्रकाशव्यवस्था करण्यात आली असून अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित राहणार आहेत.

“मिरवणुकीचा आनंद घ्या; मात्र इतरांनाही तो आनंद घेता यावा, यासाठी वेळेचे आणि प्रशासनाच्या नियमांचे भान ठेवा. गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून शांतता व कायदा-सुव्यवस्था राखावी,” असे आवाहन लोणावळा शहर पोलिसांनी केले आहे.

Previous Post

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

Related Posts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
1
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
1
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
4
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
5
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी
Blog

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

September 24, 2026
6
Blog

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026
7
Next Post
समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

ताज्या बातम्या

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In