सेवा संकल्प अभियान व ‘माझा गाव आरोग्य संपन्न गाव’ उपक्रमांतर्गत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रतिनिधी :
निमसोड : प्राथमिक आरोग्य केंद्र, निमसोड येथे दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी सेवा संकल्प अभियान, ‘माझा गाव आरोग्य संपन्न गाव’ उपक्रम तसेच आयुर्वेद दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील वयोवृद्धांसह लहान-थोर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आली. आरोग्याच्या दृष्टीने योगाचे महत्त्व आणि नियमित योगाभ्यासाचे फायदे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरासाठी परिसरातील लाभार्थी, आरोग्य कर्मचारी तसेच आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत









