• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; पिंपरी-चिंचवडमध्ये २० गुन्हे दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 24, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर पोलिसांची कारवाई; ध्वनीक्षेपक यंत्रणा व साहित्य जप्त

पुणे प्रतिनिधी:

RelatedPosts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

पुणे : गणेशोत्सवाच्या सातव्या दिवसाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करून डीजे वाजविणाऱ्या गणेश मंडळांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध सहा पोलीस ठाण्यांमध्ये एकूण २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक नऊ प्रकरणांची नोंद झाली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. या बैठकीत ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियम, न्यायालयीन निर्देश तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईबाबत माहिती देण्यात आली होती. निर्धारित ध्वनीमर्यादेचे पालन करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले होते.

मात्र, सातव्या दिवसाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही गणेश मंडळांकडून या सूचनांचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित मंडळे, डीजे चालक व मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाईदरम्यान वापरण्यात आलेली ध्वनीक्षेपक यंत्रणा व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नऊ, तळेगाव दाभाडे येथे पाच, एमआयडीसी भोसरी आणि शिरगाव-परंदवडी येथे प्रत्येकी दोन, तर तळेगाव एमआयडीसी आणि बावधन येथे प्रत्येकी एका प्रकरणात कारवाई करण्यात आली.

शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गणेश मंडळांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत डीजे साऊंड सिस्टिम, दोन मिक्सर, दोन ॲम्प्लीफायर मशीन तसेच एक वाहन पोलिसांनी जप्त केले.

गणेश विसर्जन मिरवणुका उत्साहात पार पडत असताना सार्वजनिक उत्सवाचा उत्साह कायम ठेवून ध्वनीमर्यादा व कायदेशीर नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

Next Post

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

Related Posts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
0
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
0
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
0
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
0
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
0
ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही
Blog

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

September 24, 2026
2
Next Post
नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In