नवापूर मतदारसंघातील जनतेच्या सुख, समृद्धी व उत्तम आरोग्यासाठी मातेच्या चरणी प्रार्थना
नवापूर (प्रतिनिधी, मनोज चौधरी) : श्रद्धा, भक्ती आणि आस्थेचे प्रतीक असलेल्या शिर्वे येथील जागृत देवस्थान धवलीबारी माता मंदिरात नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. शिरीषदादा नाईक साहेब यांनी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी मातेच्या चरणी नतमस्तक होत नवापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराटीसाठी मनोभावे प्रार्थना केली.
धवलीबारी माता हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, या जागृत देवस्थानावर अनेक भाविकांची अपार श्रद्धा आहे. मातेच्या दर्शनासाठी परिसरातील विविध गावांमधून भाविक मोठ्या भक्तिभावाने येत असतात. अशा या पवित्र देवस्थानाला भेट देत आमदार शिरीषदादा नाईक यांनी मातेचे दर्शन घेतले आणि जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
यावेळी नवापूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला सुख-शांती लाभावी, शेतकरी बांधवांच्या जीवनात समृद्धी यावी, सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे तसेच परिसरात विकास, आनंद आणि भरभराट नांदावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मातेच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुखाचे आणि समाधानाचे क्षण यावेत, अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.
या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य श्री. राम कोकणी, श्री. यशवंत कोकणी, श्री. एन. जी. वसावे सर, श्री. राजू साहेब यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनीही धवलीबारी मातेच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक असलेल्या या देवस्थानातील दर्शनामुळे परिसरातील भक्तिमय वातावरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
आई धवलीबारी मातेचा आशीर्वाद नवापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेवर सदैव राहो आणि सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी व उत्तम आरोग्य नांदो, हीच मातेच्या चरणी प्रार्थना!
जय माता दी! 🙏🌺
नवापूर तालुका प्रतिनिधी : मनोज चौधरी










