श्रीगोंदा : प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर येथे सन २०२६ ते २०२८ या सालाकरिता शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडी करणे कामी पालक सभा सोमवार दिनांक 12 /10/ 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती. या पालक सभेच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनचे अध्यक्ष शिवा (आप्पा )घोडके हे होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष संग्राम भैया घोडके तसेच उद्योजक भारत भाऊ घोडके, बौद्धाचार्य आनंद (भाऊ )धोंडिबा घोडके, दैनिक नगर दवंडी चे पत्रकार संदीप उमाप उपस्थित होते.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब घोडके, माजी उपाध्यक्ष पप्पू घोडके व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. या सभेमधून कांतीलाल नामदेव घोडके, शिल्पा निळकंठ गाडे, श्रीमती वर्षा विकी शेलार, . किरण रवींद्र शिंदे, अर्जुन बापू ससाणे, सौ. सुषमा संदीप उमाप, शशिकांत उत्तम घोडके, सौ. पुष्पा पप्पू घोडके, सौ. सुजाता विशाल रजपूत, . राम अर्जुन घोडके व सौ. निलमताई आनंद घोडके यांची पालक सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे शिक्षण तज्ञ प्रतिनिधी म्हणून सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण प्रेमी शिवाप्पा घोडके यांची निवड करण्यात आली. शिक्षक प्रतिनिधी म्हणून . संतोषकुमार किसनराव खंडागळे व श्रीमती वैशाली शिवदास परहर, स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी म्हणून वार्डाच्या नगरसेविका सौ. वंदनाताई संग्राम घोडके यांची निवड करण्यात आली तर सचिव (पदसिद्ध ) म्हणून शाळेचे मुख्याध्यापक अशोक कुदांडे हे काम पाहतील.
या पालक प्रतिनिधींमधून अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके तर उपाध्यक्षपदी सौ. सुषमा संदीप उमाप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव . संतोष खंडागळे यांनी मांडला व त्यास अनुमोदन बबन गाडेकर यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक . अशोक कुदांडे यांनी केले, तर आभार माजी अध्यक्ष व्यवस्थापन समिती भाऊसाहेब घोडके यांनी मानले. या प्रसंगी बाळा घोडके, सागर मोरे, राम घोडके, दत्ता घोडके, गणेश घोडके, बाबू ससाणे, मच्छिंद्र ससाने, रोहित घोडके, सचिन घोडके, मंगेश घोडके, नितीन घोडके, जानवी ससाणे, निकिता शिरवाळे, विजयमाला घोडके, निखिल घोडके, बबन घोडके, आशियाना खान आदी सिद्धार्थनगर आणि ससाणेनगर मधील नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











