• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब

Pratik Tidke by Pratik Tidke
October 12, 2026
in Blog
0
जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

ऑनलाइन अर्जांना विलंब, किरकोळ स्पेलिंगच्या चुकांवरून न्यायालयीन आदेशाची मागणी होत असल्याचा आरोप; मुस्लिम अधिकार परिषद आक्रमक

परभणी | प्रतिनिधी : रमेश मुलगीर

परभणी महानगरपालिकेसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळवताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. जुन्या नोंदी उपलब्ध असतानाही नावातील किरकोळ स्पेलिंगच्या चुकांमुळे न्यायालयाचा आदेश आणण्यास सांगितले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ऑनलाइन अर्ज करूनही चार-चार महिने मंजुरी मिळत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे मुस्लिम अधिकार परिषदेने म्हटले आहे.

RelatedPosts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

आथलीत अवैध रेती उत्खननावर जिल्हा पोलिसांचा ऐतिहासिक दणका ▪️२७ वाहने जप्त, ३ आरोपी ताब्यात!

या प्रश्नावर मुस्लिम अधिकार परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे तक्रारी मांडल्या. प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत होणारा कथित त्रास थांबवावा आणि किरीट सोमय्या यांच्या हस्तक्षेपाचा प्रश्नही उपस्थित करत अनावश्यक हस्तक्षेप बंद करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी नियमबाह्य आदेश दिले नसल्याचे स्पष्ट करत संबंधित निवेदन महानगरपालिका आयुक्तांकडे पाठवले.

त्यानंतर शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांची भेट घेतली. नागरिकांना प्रमाणपत्रांसाठी होणारा त्रास तातडीने थांबवावा, तसेच जाणीवपूर्वक स्पेलिंगच्या चुका करून नागरिकांना त्रास दिला जात असल्याच्या आरोपांची चौकशी करून संबंधित नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावर आयुक्तांनी नियमानुसार जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे देण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रमाणपत्रांच्या मंजुरी प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितल्याची माहिती परिषदेच्या वतीने देण्यात आली..

आश्वासनानंतरही तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत आणि प्रलंबित अर्जांवर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी मुस्लिम अधिकार परिषदेने केली आहे. प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनानंतरही प्रश्न सुटला नाही, तर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही परिषदेकडून देण्यात आला.

या भेटीदरम्यान संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रमाणपत्रांच्या मंजुरीतील विलंब आणि नागरिकांच्या तक्रारींची प्रशासनाकडून दखल घेऊन प्रक्रिया सुलभ केली जाते का, याकडे आता परभणीकरांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Previous Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

Related Posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड
Blog

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

October 12, 2026
1
पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर
Blog

पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

October 12, 2026
2
आथलीत अवैध रेती उत्खननावर जिल्हा पोलिसांचा ऐतिहासिक दणका ▪️२७ वाहने जप्त, ३ आरोपी ताब्यात!
Blog

आथलीत अवैध रेती उत्खननावर जिल्हा पोलिसांचा ऐतिहासिक दणका ▪️२७ वाहने जप्त, ३ आरोपी ताब्यात!

October 12, 2026
2
🪔 दीपप्रज्वलनाने दांडिया उत्सवाचा शुभारंभ! 🪔
Blog

🪔 दीपप्रज्वलनाने दांडिया उत्सवाचा शुभारंभ! 🪔

October 12, 2026
0
भाजपाचे अध्यक्ष मुकुंद पुजारी व मराठा समाजाचे युवा नेते सागर धनवडे यांनी दुर्गा मातेकडे साकडे ……….
Blog

भाजपाचे अध्यक्ष मुकुंद पुजारी व मराठा समाजाचे युवा नेते सागर धनवडे यांनी दुर्गा मातेकडे साकडे ……….

October 12, 2026
2
सावरगावमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण!
Blog

सावरगावमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण!

October 12, 2026
25

ताज्या बातम्या

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब

October 12, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

October 12, 2026
पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In