भूम . यंदा पावसाने ओढ दिल्याने आणि दुष्काळी परिस्थितीमुळे आपल्या परिसरातील बळीराजा व सर्वसामान्य नागरिक चिंतेत असताना, मतदारसंघाला स्वतःचे कुटुंब मानून प्रत्येक घटकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या भूमिकेतून दुष्काळग्रस्त बांधवांसाठी आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंतांची ‘माणुसकीची दिवाळी’ भूम परंडा वाशी मतदारसंघातील प्रत्येक रेशनकार्डधारक कुटुंबाला ५ किलो साखर व तिन्ही तालुक्यांतील भूमिहीन व शेतमजूर दुष्काळग्रस्त कुटुंबांपर्यंत “दिवाळी किट” थेट घरापर्यंत पोहोचवली जाणार असून या ‘माणुसकीची दिवाळी’ किटमध्ये रवा, स्वयंपाकाचे तेल, हरभरा डाळ, मैदा, चिवडा मसाला, चुरमुरा, साखर, चहापत्ती, सुगंधी तेल, मोती अंघोळीचा साबण आणि सुगंधी उटणे अशा सर्व आवश्यक साहित्यांचा समावेश करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी मात्र हेवेदावे न करता शेवटच्या घरापर्यंत किट पोहचेल अशी व्यवस्था करावी असे आव्हान देखील प्रा. डॉ. आ.तानाजीराव सावंत यांनी केले आहे.










