पशुगणना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने 3000जनांवरांच्या पाठीमागे एक प्रगणक अशी निवड करण्यात आली.प्रगणकाने तीन महिन्यांत पूर्ण करून पशुसंवर्धन विभागाला पाठवण्यात आली.परंतू त्या प्रगणकांना जे मानधन देण्यात येणार होते ते सप्टेंबर 2026 मध्ये देण्यात आले परंतु ते मानधन संपूर्ण न देता साठ टक्केच देण्यात आले आहे उर्वरित रक्कम कधी मिळणार याची चौकशी करण्यात आली त्यावेळी केंद्र सरकार कधी देईल त्या वेळी मिळेल असे सांगण्यात येते आहे . राज्यात दुष्काळ पडला आहे तरी शासनाने लवकरात लवकर प्रगणकांचे राहीलेली रक्कम जमा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रगणकांची रक्कम लवकर जमा न केल्यास प्रत्येक भागातील जनावरांच्या दवाखान्याला कुलपे लावून आंदोलन करण्यात येईल.










