मासिक पाळी ही नैसर्गीक प्रक्रिया आहे त्यामुळे मासिक पाळी बाबत मुलींनी गैरसमज करू नयेत. मासिक पाळीबाबत पालकांशी संवाद व डॉक्टरांचा सल्ला घेणे. गरजेचे आहे.असे आवाहन अंधश्रध्दा निर्मुलन समिती कोल्हापूर शहर कार्याध्यक्ष स्वाती कृष्णा यांनी केले. त्या अंधश्रध्दा निर्मुलन समिती कोगे यांच्यावतीने किशोरवयीन मुलींसाठी आयोजीत ” वयात येताना” या संवाद कार्यक्रमात बोलत होत्या.
इयत्ता 6वी ते 10 च्या विद्यार्थिनींशी संवाद साधत मुलींनी विचारलेल्या प्रश्नांची अगदी सोप्या भाषेत उत्तरे दिली कार्यक्रमाचे स्वागत शिवाजी बागडी सर यांनी केले.






