• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा तालुका शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण.

Pratik Tidke by Pratik Tidke
October 13, 2026
in Blog
0
शहादा तालुका शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण.
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.१३(का.प्र.)
शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शहादा तालुक्यात शिवसेना पक्षाच्या विविध पदांवर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख ॲड. रामभैय्या चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्तीपत्रे देण्यात आली असून, शिवसेना नेते तथा आमदार श्री. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नंदुरबार येथील आमदार कार्यालयात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
शहादा तालुका शिवसेना प्रमुख मनलेश जायसवाल यांनी केलेल्या शिफारशींनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

RelatedPosts

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

मोटारसाईकल चोरटे चांदवड पोलीसांनी केले जेरबंद फिर्यादी-


यावेळी नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख ॲड. रामभैय्या रघुवंशी, युवा सेना जिल्हाप्रमुख मोहितसिंग राजपूत, नगरसेवक कुणाल वसावे, शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल, शहादा शहरप्रमुख जितेंद्र जमदाडे, जयसिंग ठाकरे, मुरलीधर वळवी, हितेंद्र वर्मा, गोपाल कोळी, पृथ्वीराज राजपूत, धनराज जायसवाल, दिलीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, “शिवसेना हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पक्षाच्या धोरणानुसार पार पाडावी. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच प्रत्येक गावात आणि पाड्यात शिवसेनेचा विस्तार करून पक्षाच्या शाखा स्थापन कराव्यात. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा सक्रियपणे प्रचार व प्रसार करावा,” असे आवाहन त्यांनी केले. नियुक्तीपत्रे प्राप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये शहादा तालुका प्रमुख अजय दाजू भिल, तालुका संघटक हेमंत मन्साराम सूर्यवंशी, महिला तालुका प्रमुख संगीता सचिन पवार, युवती सेना तालुका प्रमुख प्रियंका गोविंद ठाकरे, सहसंघटक एकनाथ रतिलाल ठाकरे यांचा समावेश आहे.

तालुका उपसंघटक: संतोष सरदारसिंग गिरासे, गणेश कालूसिंग तडवी, मणिलाल बालम सोनवणे, दिनेश भोमराज पवार, आनंदा गोविंद ठाकरे आणि अशोक हुऱ्या वसावे.तालुका उपप्रमुख: संतोष फकीरा चौधरी, छगन गुंजाऱ्या तडवी, जगदीश रूपसिंग चव्हाण, विलास वासुदेव चौधरी, विकास राजेंद्र पाटील, कैलाश टुका पवार, सुजित रमेश शेमले व जगदीश धनराज पाटील.तालुका समन्वयक: लक्ष्मण भटू पवार, विनोद मोहन पाटील, संतोष गुलाब चित्ते, प्रकाश गुलाब चित्ते (शिंपी), तुकाराम प्रल्हाद भोई आणि अमृत लालसिंग भिल.तालुका उपसमन्वयक: श्रवण बाबुराव भिल, संजय अंबरसिंग सूर्यवंशी आणि प्रदीप हिरालाल पाडवी.शहादा विधानसभा प्रमुख: भीमसिंग भाटया तीरसे.शहादा विधानसभा समन्वयक: भारसिंग जामसिंग वसावे.नंदुरबार विधानसभा संघटक (शहादा तालुका क्षेत्र): कांतीलाल उत्तम धनगर आणि अनिल धुडकू साठे.नंदुरबार विधानसभा प्रमुख (शहादा तालुका क्षेत्र): रितेश खेमराज बोरसे आणि संतोष खंडू पाटील.नंदुरबार विधानसभा समन्वयक (शहादा तालुका क्षेत्र): अमृत चिमण ठाकरे, श्रीगणेश बन्सीलाल सोलंकी आणि नरेश भास्कर पाटील.गटप्रमुख: पाडळदा गटप्रमुख राकेश ब्रिजलाल पवार, प्रकाशा गटप्रमुख प्रेमल संजय राठोड (राहुल लोहार) आणि चांदसैली (फॉरेस्ट) गटप्रमुख कृष्णा हारसिंग सोनवणे.यावेळी शहादा तालुका शिवसेना प्रमुख मनलेश जायसवाल यांनी आगामी काळात शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले.पक्ष प्रवेशानंतर उर्वरित पदांसाठी वरिष्ठांकडे शिफारशी करण्यात येतील आणि त्यानंतर पुढील नियुक्त्या करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.नियुक्तीपत्र वितरणानंतर शहादा तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी व शिवसैनिकांनी शहादा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकस्थळी भेट देऊन अभिवादन केले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमामुळे शहादा तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला मोठी चालना मिळणार असल्याची भावना उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी व्यक्त केली.

Ad 1
Previous Post

नागरी समस्यांवर वकिलांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.

Next Post

दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव; अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न.

Related Posts

Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
11
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
3
मोटारसाईकल चोरटे चांदवड पोलीसांनी केले जेरबंद फिर्यादी-
Blog

मोटारसाईकल चोरटे चांदवड पोलीसांनी केले जेरबंद फिर्यादी-

October 13, 2026
1
एरंडोलच्या आरोग्यदूताचा सन्मान ; विक्की खोकरे यांना दादर येथे “शरद रत्न पुरस्कार” प्रदान..!-
Blog

एरंडोलच्या आरोग्यदूताचा सन्मान ; विक्की खोकरे यांना दादर येथे “शरद रत्न पुरस्कार” प्रदान..!-

October 13, 2026
4
भुसणी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चार जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
Blog

भुसणी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चार जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

October 13, 2026
142
Blog

मारेगावच्या, आश्रम शाळेत विद्यार्थिनींना मारहाण व छेडछाड. महिला अधीक्षक व पतीविरुद्ध फोकसो अंतर्गत गुन्हा दाखल…………..

October 13, 2026
13
Next Post

दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव; अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न.

ताज्या बातम्या

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
मोटारसाईकल चोरटे चांदवड पोलीसांनी केले जेरबंद फिर्यादी-

मोटारसाईकल चोरटे चांदवड पोलीसांनी केले जेरबंद फिर्यादी-

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In