मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे…
. 🖊️..
सारथी महाराष्ट्राचा न्यूज. 🖊️.. स्थानिक मारेगाव शहरात असलेल्या, स्वर्गीय चिंधुजी पुरके आश्रम शाळा, विद्यार्थिनींना मारहाण धमकी व छेडछाड प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या आश्रम शाळेत अधीक्षक कीर्ती संजय बावणे, आणि तिचे पती संजय बावणे यांच्या विरुद्ध मारेगाव पोलीस स्टेशन विद्यार्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे स्पष्ट होत असल्याचे दिसून येत आहे. संस्थेच्या माहितीनुसार 8 ऑक्टोंबर ला अधीक्षक महिलेला निलंबित करण्यात आले मग त्यानंतर कुठल्या उद्देशाने मुलींच्या वस्तीगृहात अधीक्षक महिला व त्यांचे पती कशाकरिता गेले ही गोष्ट अजूनही स्पष्ट झाली नाही. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे. प्राप्त माहितीनुसार.





