मुरूम.सा. वा. लाडलेसाब नदाफ
भुसणी महामार्गावर मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ता अपघातात एकाच कुटुंबातील चार सदस्यांसह रस्त्याने जाणारे एक व्यक्ती असे एकूण पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री. विकास रेबू पवार (वय ३८, रा. भुसणी तांडा) हे आपल्या कुटुंबासह प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांची पत्नी सौ. प्रियांका विकास पवार (वय ३०), मुलगी संस्कृती विकास पवार (वय ५ वर्षे), मुलगा शंभू विकास पवार (वय ३ वर्षे) तसेच रस्त्याने जात असलेले श्री. निरंजन पांडुरंग बिबळीकर (वय ४६, रा. बलसूर) हे जखमी झाले.
अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांनी तत्काळ जखमींना वाहनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी पोलीस व रुग्णवाहिकेला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच मुरूम पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बचावकार्य हाती घेतले आणि जखमींना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली.
प्राथमिक उपचारासाठी सौ. प्रियांका विकास पवार आणि कु. संस्कृती विकास पवार यांना ग्रामीण रुग्णालय, मुरूम येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले.
तर श्री. विकास रेबू पवार, कु. शंभू विकास पवार आणि श्री. निरंजन पांडुरंग बेबळीकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचार





