चांदवड! प्रतिनिधी
राहुल विलास ढोमसे रा. चांदवड यांची मोटारसायकल क्रमांक MH15JD9350 ही दिनांक 10.10.2026 रोजी रात्री 1.00 वा. सुमारास चांदवड येथून चोरी झाल्याने चांदवड पोलीस ठाणे येथे दि. 10.10.2026 रोजी गु.र.न. 411/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) 3(5) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपास अनुषंगाने नाशिक ग्रामीणचे मा. पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, मालेगावचे मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सूरज गुंजाळ आणि मनमाड विभागाचे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस ठाणेचे मा. पोलीस निरीक्षक श्री. अभिजीत सोनवणे, पोलीस हवालदार स्वप्नील जाधव, पोलीस अंमलदार प्रदीप आजगे, विक्रम बस्ते, भूषण साळवे यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमी नुसार संशयित इसम- किशोर साहेबराव कापसे वय 26 वर्ष व मनोज उर्फ मयूर संजय जाधव वय पंचवीस वर्षे दोन्ही राहणार तांगडी तालुका चांदवड जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी करता त्यांनी चांदवड शहरातून फिर्यादीची मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून आज दि. 12.10.2026 रोजी मा. न्यायालय, चांदवड येथे हजर केले आहे. मा. पोलीस निरीक्षक श्री. अभिजीत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील सविस्तर तपास पोलीस हवालदार स्वप्नील जाधव हे करत आहेत.




