वाशी तालुका प्रतिनिधी:राजेंद्र अहिरे
पूर्वी बँक कर्जा साठी बॅंकेत चकरा मारून अक्षरशः लोक थकून जायचे पन बँकेचे कर्ज काही मिळत नव्हते पण आता यासाठी बॅंकेत जायची गरज नाही आता जणसमर्थ या शासकीय पोर्टल वरुण सर्व कर्ज मागणीचे अर्ज करता येतील अशी माहिती बँक शाखाधिकारी खंदारे साहेब यांनी दिली.
बँक ऑप महाराष्ट्र शाखा पारगाव मध्ये 1100 पीक कर्ज खातेदार होते कर्ज माफी नंतर सिरियल नंबर प्रमाणे 400 च्या आसपास पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. पीककर्जा साठी आणखी शेतकरी उत्सुक असतिल तर त्यांनी जण समर्थ या पोर्टल वरुण कर्ज मागणी करावी .तसेच बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया यांचा टाय अप असल्याने क्रेडिट कार्ड हे आता बँक ऑफ महाराष्ट्र च्या पारगाव शाखेत मिळेल याचा सर्वानी लाभ घ्यावा असे बँक सूत्रांनी सांगण्यात आले आहे.






