सारथी महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क नवी मुंबई प्रतिनिधी :- अमोल अभंग
नवी मुंबई घणसोली (दि. १२ ऑक्टोबर):
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात आणि देशभरात सुरू असलेल्या ‘वोट चोरी’च्या प्रकारांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार घणसोली विभागाच्या वतीने घणसोली गावातील दगडू चाहू पाटील चौक येथे भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा आणि ‘वोट चोरी’विरोधातील फलक घेऊन निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी परिसरातील स्थानिक नागरिकांनीही या मोहिमेत मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
प्रमुख नेतृत्व आणि उपस्थिती
या आंदोलनाचे नेतृत्व घणसोली विभाग अध्यक्ष नितीन नाईक, प्रभाग क्रमांक ८ चे विभाग अध्यक्ष रोहन पाटील आणि विभाग सचिव संजय कोळी यांनी केले.
या निदर्शनांना महाविकास आघाडीतील घटकांचाही पाठिंबा मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभाग प्रमुख प्रेमनाथ म्हात्रे, रमाकांत पाटील आणि शाखाप्रमुख सोमनाथ पाटील यांनी आंदोलनात सहभागी होऊन आंदोलकांना पाठिंबा दर्शवला.
तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते—चंदन रानकर, शाखा अध्यक्ष केतन कोळी, संतोष बाजड, उपशाखा अध्यक्ष योगेश गायकर, वाहतूक सेनेचे दत्ता काळे, केतन मढवी, दीपक साबळे, सिताराम शेलार (मामा), राजाराम माली, विकास पाटील, दादाराव बनकर, प्रकाश साबले, राहुल कांबळे, राकेश पवार, धनराज वाघमारे, सुनील चव्हाण, महादेव शिंदे आणि अभी काकडे यांच्यासह शेकडो महाराष्ट्र सैनिक या प्रसंगी उपस्थित होते.
‘वोट चोरी बंद करा, लोकशाही वाचवा’
“निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष राहिली पाहिजे. मतदारांच्या हक्कांवर होणारी गदा खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा यावेळी मनसे नेत्यांनी दिला. ‘वोट चोरी बंद करा आणि लोकशाही वाचवा’ अशा तीव्र घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.







