प्रतिनिधी ज्ञानेश्वर सावळे मुक्ताईनगर
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे यंदाच्या नवरात्री उत्सवाचे खास आकर्षण आहे “बारा ज्योतिर्लिंग -एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे दिव्य दर्शन होणार आहे तसेच भगवान शिवाच्या भक्तांसाठी एक अद्भुत, भव्य आणि भक्तिमय अनुभव, संपूर्ण भारताच्या विविध पवित्र स्थळी “बारा ज्योतिर्लिंग – एकाच ठिकाणी स्थापित असलेल्या दिव्य भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन होणार आहे.एकाच ठिकाणी दर्शन घेण्याचा दुर्मिळ योग यंदा जय शिवाजी दुर्गा मंडळ उत्सव समिती छत्रपती शिवाजी महाराज नगर अंतुर्ली घेऊन येत आहे.
,भव्य शिव गृहेच्या माध्यमातून साकारण्यात आला बारा ज्योतिर्लिंगाचा मनमोहक देखावा.शिवगुहेत प्रवेश करताच निसर्गरम्य पर्वतरांगांचा अनुभव
भक्तिमय वातावरण
आकर्षक विद्युत रोषणाई
भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन
आणि मनाला आध्यात्मिक समाधान देणारा अद्भुत देखावा असा हा दिव्य, भव्य आणि दुर्मिळ दर्शनाचा सोहळा अंतुर्ली व परिसरातील सर्व शिवभक्तांसाठी साकारण्यात आला आहे.
आई जगदंबेच्या नवरात्र उत्सवात भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची ही अनोखी संधी चुकवू नका आपल्या परिवारासह अवश्य भेट द्या.
या देखाव्याचे आयोजक
जय शिवाजी दुर्गा मंडळ उत्सव समिती, छत्रपती
शिवाजी महाराज नगर अंतुर्ली हे आहे.








