• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

Pratik Tidke by Pratik Tidke
October 13, 2026
in Blog
0
समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

समाज प्रगती सहयोग संस्थेचा अभिनव उपक्रम; स्थानिक बियाण्यांचे संवर्धन, पीक विविधीकरण आणि शाश्वत शेतीचा संदेश

RelatedPosts

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

धारणी, दि. १३ ऑक्टोबर २०२६ : मेळघाटातील पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन, स्थानिक जैवविविधतेचे जतन, पारंपरिक कृषी ज्ञानाचे पुनरुज्जीवन आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने समाज प्रगती सहयोग संस्थेच्या वतीने धारणी येथील बालाजी मंगलम फंक्शन हॉलमध्ये ‘पारंपरिक बीज महोत्सव’ उत्साहात आयोजित करण्यात आला. या महोत्सवात मेळघाटातील विविध गावांमधील ३०० हून अधिक महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

‘आमचे बियाणे, आमची ओळख, आमचे भविष्य’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक बियाण्यांचे महत्त्व, पारंपरिक शेतीपद्धती, पीक विविधीकरण, नैसर्गिक शेती आणि पर्यावरणपूरक कृषी व्यवस्थापन याबाबत जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमाला अर्चना निस्ताने, प्रकल्प संचालक, आत्मा, अमरावती; प्रणिता कडू, ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, अमरावती; संदीप शिरसाठ, सहाय्यक वनसंरक्षक, धारणी; उमेश जाधव, तालुका कृषी अधिकारी, धारणी; अविनाश कांबळे, पशुसंवर्धन अधिकारी, धारणी; अमोल पाटील, तालुका व्यवस्थापक, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), धारणी; प्रमोद दुबे, समन्वयक, आत्मा, अमरावती; संजय इंगळे, तालुका समन्वयक, आकांक्षी जिल्हा कार्यक्रम; तसेच शोभित जैन, संस्थापक, समाज प्रगती सहयोग आणि अनिमेश मंडल, आणि समाज प्रगती सहयोग ची टीम उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांनी महिला शेतकऱ्यांना पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन, पीक उत्पादनातील विविधता, मातीचे आरोग्य, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, शेतीपूरक व्यवसाय आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या पारंपरिक पीक वाणांचे जतन करणे आणि रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करून पर्यावरणपूरक शेतीपद्धतींचा अवलंब करणे महत्त्वाचे असल्याचा संदेश या महोत्सवातून देण्यात आला.

महोत्सवात मेळघाटातील स्थानिक व पारंपरिक पिकांच्या बियाण्यांच्या विविधतेला विशेष महत्त्व देण्यात आले. यामध्ये भोंगा बाबा, सरकारी, जाडे बाबा, ब्यागफुल, काळा, हरवा, नागपुरी आदी भाताच्या पारंपरिक वाणांसह सावा, कोदो, कुटकी, नाचणी आणि ज्वारी यांसारख्या भरडधान्यांच्या विविधतेवर भर देण्यात आला.
पारंपरिक बियाण्यांचे जतन, बियाण्यांची देवाणघेवाण, स्थानिक कृषी ज्ञानाचे आदानप्रदान आणि पीक विविधीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक व अन्नसुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीने या महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

मेळघाटातील आदिवासी समाजामध्ये पारंपरिक बियाण्यांचे जतन आणि कृषी ज्ञानाचे संवर्धन करण्यात महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या बियाणे निवड, साठवणूक आणि शेतीपद्धतींच्या ज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना आपले अनुभव, स्थानिक ज्ञान आणि शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोग मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. तसेच पारंपरिक पिकांचे पुनरुज्जीवन, पोषणसुरक्षा, जैवविविधता संवर्धन आणि शाश्वत उपजीविका यांमधील परस्परसंबंध अधोरेखित करण्यात आला.

समाज प्रगती सहयोग संस्था मेळघाट परिसरात शाश्वत शेती, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, जलसंधारण, पशुधन विकास, महिला सक्षमीकरण आणि उपजीविका विकासाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन आणि पीक विविधीकरणाला चालना देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
‘पीक विविधता जोपासूया, समृद्ध शेतकरी, निरोगी समाज आणि सुरक्षित भविष्य घडवूया’ या संदेशासह पारंपरिक बीज महोत्सवातून मेळघाटातील स्थानिक कृषी वारसा जतन करण्याचा आणि महिला शेतकऱ्यांच्या सहभागातून शाश्वत शेतीला बळकटी देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

Ad 1
Previous Post

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

Related Posts

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..
Blog

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
5
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
Blog

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026
8
Blog

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

October 13, 2026
9
Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
14
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
3
मोटारसाईकल चोरटे चांदवड पोलीसांनी केले जेरबंद फिर्यादी-
Blog

मोटारसाईकल चोरटे चांदवड पोलीसांनी केले जेरबंद फिर्यादी-

October 13, 2026
1

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In