• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धम्मराजिका बुद्ध विहारात वर्षावास समापन सोहळा उत्साहात संपन्न

Pratik Tidke by Pratik Tidke
November 12, 2026
in धार्मिक व सांस्कृतिक
0
धम्मराजिका बुद्ध विहारात वर्षावास समापन सोहळा उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

भोजनदान, मान्यवरांचा सत्कार आणि बुद्ध-भीम गीतांच्या सुरेल कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मारेगाव, प्रतिनिधी : भगवान गौतम बुद्ध यांच्या करुणा, मैत्री, प्रज्ञा आणि समतेच्या विचारांचा जागर करीत धम्मराजिका बुद्ध विहार, मारेगाव येथे वर्षावास समापन व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. सोमवार, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित या सोहळ्याला मान्यवरांसह समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

RelatedPosts

हरपवडे येथील श्री रासूबाई मंदिरात महाआरती; विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवरीतील यमाई देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तिमय धूम!

जतच्या यल्लमा व आंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर धम्मराजिका बुद्ध विहारात बुद्ध वंदना व पूजाविधी पार पडला. यावेळी सामाजिक आणि धम्मकार्यामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याला वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय भाऊ देरकर, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका किरण ताई देरकर, रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष काळे साहेब, वणी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुरेश भाऊ रायपुरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजूभाऊ उंबरकर, मारेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मनीष मस्की, उदय भाऊ रायपुरे, दुष्यंत जयस्वाल, वणीचे ठाणेदार भानुदासजी पिदुरकर व त्यांच्या पत्नी कल्पना पिदुरकर, मारेगावचे ठाणेदार सागर दांनडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

बुद्ध-भीम गीतांनी रंगली भजन संध्या

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या जगन चांदेकर ग्रुपच्या बुद्ध-भीम गीतांच्या आणि भजनांच्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. भगवान गौतम बुद्धांचे विचार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समतावादी तत्त्वज्ञान आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या गीतांनी संपूर्ण परिसर धम्ममय झाला.

भोजनदानातून सामाजिक एकोप्याचा संदेश

या निमित्ताने आयुष्यमती पूनम अजय रायपुरे यांच्या वतीने सस्नेह भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते. सहभोजनाच्या माध्यमातून बंधुभाव, सामाजिक एकोपा आणि आपुलकीचा संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवर आणि समाजबांधवांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

रायपुरे परिवाराकडून आयोजकांचे आभार

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्मराजिका बुद्ध विहार, रमाई महिला मंडळ, युवकवर्ग आणि समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले. नियोजनापासून ते कार्यक्रमाच्या व्यवस्थेपर्यंत सर्वांनी मोलाचे सहकार्य केले. या यशस्वी आयोजनाबद्दल रायपुरे परिवाराच्या वतीने सर्व आयोजक, महिला मंडळ, युवकवर्ग, समाजबांधव, उपस्थित मान्यवर आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले

वर्षावास समापन सोहळ्याच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी विचारांची प्रेरणा आणि समाजातील एकता, बंधुता व सामाजिक सलोखा अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

Ad 1
Tags: Balu Khaire
Previous Post

दिवाळी पाडव्यानिमित्त मलठण विविध विकास सहकारी कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने मिठाई वाटप

Related Posts

हरपवडे येथील श्री रासूबाई मंदिरात महाआरती; विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
धार्मिक व सांस्कृतिक

हरपवडे येथील श्री रासूबाई मंदिरात महाआरती; विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

October 20, 2026
45
शिवरीतील यमाई देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तिमय धूम!
धार्मिक व सांस्कृतिक

शिवरीतील यमाई देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तिमय धूम!

October 19, 2026
37
जतच्या यल्लमा व आंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
धार्मिक व सांस्कृतिक

जतच्या यल्लमा व आंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

October 11, 2026
14
ताज्या घडामोडी

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

June 30, 2026
37
धार्मिक व सांस्कृतिक

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

May 28, 2026
5
कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
धार्मिक व सांस्कृतिक

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

April 20, 2026
37

ताज्या बातम्या

धम्मराजिका बुद्ध विहारात वर्षावास समापन सोहळा उत्साहात संपन्न

धम्मराजिका बुद्ध विहारात वर्षावास समापन सोहळा उत्साहात संपन्न

November 12, 2026
दिवाळी पाडव्यानिमित्त मलठण विविध विकास सहकारी कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने मिठाई वाटप

दिवाळी पाडव्यानिमित्त मलठण विविध विकास सहकारी कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने मिठाई वाटप

November 12, 2026
राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत अदिती चांदगुडे हिला कांस्यपदक

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत अदिती चांदगुडे हिला कांस्यपदक

November 12, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In