• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भांबर्डे येथे शिक्षण परिषदेत सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 3, 2026
in Blog
0
भांबर्डे येथे शिक्षण परिषदेत सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान!
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

मूल्यवर्धन विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन; चार शिक्षकांचा शाल, श्रीफळ, फेटा व सन्मानचिन्ह देऊन गौरव

भांबर्डे : रांजणगाव गणपती केंद्रांतर्गत भांबर्डे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतीच शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. या परिषदेत मूल्यवर्धन या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या चार सेवानिवृत्त शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

RelatedPosts

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

नवदिशा महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा पेण पंचायत समितीत उत्साहात संपन्न!

शिक्षण परिषदेत सय्यद सर आणि चोले सर यांनी मूल्यवर्धन विषयावर मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख तानाजी पाटील यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन करत शैक्षणिक कार्यातील मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी भांबर्डे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नानाभाऊ नाणेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शाल, श्रीफळ, फेटा आणि मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. तसेच रांजणगाव गणपती केंद्रातील नाथा वीर, सरला फुंदे मॅडम आणि स्मिता कुलकर्णी मॅडम यांचाही सेवानिवृत्तीनिमित्त गौरव करण्यात आला. केंद्रप्रमुख तानाजी पाटील आणि भांबर्डे शाळा व्यवस्थापन समितीच्या हस्ते चारही मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला भांबर्डे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. पवार, माजी सरपंच गोरख मस्के, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, वरुडे येथील ग्रामस्थ व समिती पदाधिकारी, पोलीस पाटील शेवाळे, पावशे सर, संगीता पळसकर, मुख्याध्यापक नामदेव गायकवाड यांच्यासह केंद्रातील शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संतोष शेवाळे, नामदेव गायकवाड, सौ. विजया तळोले, शर्मिला निचीत, पावशे सर, पोलीस पाटील शेवाळे आणि आप्पासाहेब देशमुख यांनी मनोगत व्यक्त करून सेवानिवृत्त शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव केला.

सत्काराला उत्तर देताना नानाभाऊ नाणेकर सर आणि नाथा वीर सर यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव कथन केले. प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा केली तर त्याचे फळ निश्चितच मिळते, असे विचार त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या अनुभवातून उपस्थित शिक्षकांना प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन निचीत सर यांनी केले, तर संजयकुमार वाळके सर यांनी आभार प्रदर्शन केले. शिक्षकांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव आणि शैक्षणिक मूल्यांची जपणूक अशा दुहेरी उद्देशाने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Ad 1
Tags: Sanjay Walke
Previous Post

नवदिशा महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा पेण पंचायत समितीत उत्साहात संपन्न!

Next Post

साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

Related Posts

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!
Blog

15
नवदिशा महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा पेण पंचायत समितीत उत्साहात संपन्न!
Blog

नवदिशा महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा पेण पंचायत समितीत उत्साहात संपन्न!

November 3, 2026
4
पेण प्रकल्पस्तरीय आदिवासी क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ
Blog

पेण प्रकल्पस्तरीय आदिवासी क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ

November 3, 2026
29
शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न
Blog

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

November 1, 2026
6
घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल
Blog

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल

November 1, 2026
15
Next Post
साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

ताज्या बातम्या

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

November 3, 2026
संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

November 3, 2026
साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

November 3, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In