• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 3, 2026
in Blog
0
साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम; सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांच्या हस्ते वितरण

प्रतिनिधी –

RelatedPosts

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

भांबर्डे येथे शिक्षण परिषदेत सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान!

नवदिशा महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा पेण पंचायत समितीत उत्साहात संपन्न!

कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वितरण करण्यात आले. कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शीतलकुमार डोईजड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दिवाळी अंकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब उर्फ दा. आ. पाटील होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी साधना मासिकाचे महत्त्व विशद केले. एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये साधना मासिकावर आधारित प्रश्न विचारले जातात, अशी माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले. वाचनामुळे ज्ञानात भर पडते आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पोलीस हवालदार श्री. भोसले यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारीविषयी मार्गदर्शन केले. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी तसेच ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याबाबत त्यांनी माहिती दिली. होमगार्ड श्री. पाटील यांनी मार्गदर्शन करताना आई-वडिलांप्रमाणेच शिक्षकही आपल्या जीवनात वंदनीय असतात, असे सांगून शिक्षकांचा आदर करण्याचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकांचे वितरण करण्यात आले. सहाय्यक शिक्षिका सौ. संजीवनी निर्मळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जमीर मुल्ला यांनी केले, तर श्री. अमोल मस्के सर यांनी आभार मानले.

या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर भाऊराव कनवाडकर, सचिव अजित पाटील, संस्थेचे सर्व संचालक व संचालिका, विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण पाटील, ज्येष्ठ शिक्षक सचिन गुदले, विजय माळी, दीपक चौगुले यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासोबतच सामाजिक जागरूकता आणि ज्ञानाची आवड निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

Ad 1
Previous Post

भांबर्डे येथे शिक्षण परिषदेत सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान!

Next Post

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

Related Posts

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!
Blog

13
नवदिशा महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा पेण पंचायत समितीत उत्साहात संपन्न!
Blog

नवदिशा महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा पेण पंचायत समितीत उत्साहात संपन्न!

November 3, 2026
4
पेण प्रकल्पस्तरीय आदिवासी क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ
Blog

पेण प्रकल्पस्तरीय आदिवासी क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ

November 3, 2026
29
शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न
Blog

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

November 1, 2026
6
घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल
Blog

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल

November 1, 2026
15
Next Post
संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

ताज्या बातम्या

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

November 3, 2026
संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

November 3, 2026
साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

November 3, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In