• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिमुकल्याच्या न्यायासाठी चिमुकल्याचीच धडपड; हातात मोबाईल घेत बनला बालपत्रकार!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
चिमुकल्याच्या न्यायासाठी चिमुकल्याचीच धडपड; हातात मोबाईल घेत बनला बालपत्रकार!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

मृत भावाला न्याय मिळावा म्हणून लहान भावाने टिपली आई-वडिलांची व्यथा; भिसे कुटुंबीयांचे दहा दिवसांपासून उपोषण

प्रतिनिधी

RelatedPosts

‘आयडॉल शिक्षक’ निवडीत उमरखेडची बाजी; तालुक्यातील तब्बल २८ शिक्षकांचा समावेश!

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा

सातारा : एका चिमुकल्याचा अपघाती मृत्यू झाला आणि कुटुंबातील हसते-खेळते बालपण कायमचे हरपले. आई-वडिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबण्याचे नाव घेत नाहीत. आपल्या लेकराला न्याय मिळावा, या मागणीसाठी आई-वडील गेल्या दहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप कुटुंबीयांकडून होत आहे.

या परिस्थितीत आपल्या मृत भावाला न्याय मिळावा आणि आई-वडिलांची व्यथा लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी मृत चिमुकल्याच्या लहान भावाने पुढाकार घेतला. वडिलांचा मोबाईल हातात घेऊन त्याने कॅमेरा सुरू केला आणि आई-वडिलांच्या वेदना चित्रित करण्यास सुरुवात केली. आपल्या कुटुंबाची व्यथा जगासमोर मांडण्यासाठी या चिमुकल्याने केलेली धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. हातात मोबाईल घेऊन न्यायाच्या लढ्याला आवाज देणारा हा चिमुकला अनेकांच्या नजरेत खऱ्या अर्थाने बालपत्रकार ठरला.

वाई तालुक्यातील मांढरदेवी-बोपर्डी रस्त्यावर १४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास रस्ता ओलांडताना अनुज भिसे या चिमुकल्याचा अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. मात्र, या घटनेला अनेक दिवस उलटूनही संबंधित रस्त्याच्या कामाबाबत आणि ठेकेदाराच्या जबाबदारीबाबत ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप अनुजच्या कुटुंबीयांनी केला आहे.

अनुजला न्याय मिळावा, संबंधित रस्त्याच्या कामाची खातेनिहाय चौकशी व्हावी आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या भिसे कुटुंबीयांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी कुटुंबीय आणि कार्यकर्ते गेल्या दहा दिवसांपासून अहोरात्र उपोषण करत आहेत.

मात्र, शासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचे पाहून अखेर अनुजच्या लहान भावाने वडिलांचा मोबाईल हातात घेतला आणि आपल्या आई-वडिलांचा आक्रोश व व्यथा कॅमेऱ्यात टिपण्यास सुरुवात केली. मृत भावासाठी आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या आई-वडिलांसाठी या चिमुकल्याने केलेली ही धडपड उपस्थितांच्या मनाला चटका लावणारी ठरली.

Ad 1
Tags: Ashok Chavan
Previous Post

‘आयडॉल शिक्षक’ निवडीत उमरखेडची बाजी; तालुक्यातील तब्बल २८ शिक्षकांचा समावेश!

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आयडॉल शिक्षक’ निवडीत उमरखेडची बाजी; तालुक्यातील तब्बल २८ शिक्षकांचा समावेश!

November 5, 2026
11
संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!
ताज्या घडामोडी

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

November 3, 2026
16
मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा
ताज्या घडामोडी

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा

November 3, 2026
25
पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर
ताज्या घडामोडी

पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

November 3, 2026
51
कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

November 1, 2026
11
कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न
ताज्या घडामोडी

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

November 1, 2026
20

ताज्या बातम्या

चिमुकल्याच्या न्यायासाठी चिमुकल्याचीच धडपड; हातात मोबाईल घेत बनला बालपत्रकार!

चिमुकल्याच्या न्यायासाठी चिमुकल्याचीच धडपड; हातात मोबाईल घेत बनला बालपत्रकार!

November 5, 2026

‘आयडॉल शिक्षक’ निवडीत उमरखेडची बाजी; तालुक्यातील तब्बल २८ शिक्षकांचा समावेश!

November 5, 2026
स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

November 3, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In