• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिवाळीचा फटाका…

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

मनाला स्पर्श करणारी गरिबी, बालपणातील आठवणी आणि माणुसकीची हृदयस्पर्शी लघुकथा

भारत कवितके | कांदिवली पश्चिम, मुंबई

RelatedPosts

चिमुकल्याच्या न्यायासाठी चिमुकल्याचीच धडपड; हातात मोबाईल घेत बनला बालपत्रकार!

‘आयडॉल शिक्षक’ निवडीत उमरखेडची बाजी; तालुक्यातील तब्बल २८ शिक्षकांचा समावेश!

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

साधारण पहाटेची चार-पाच वाजण्याची वेळ असावी. हवेत गारवा जाणवत होता. दिवाळीचे दिवस असल्याने आम्ही घरातील सर्वजण लवकर उठून दिवाळीच्या वातावरणात दंग होतो. फटाक्यांचे सातत्याने होणारे आवाज, सर्वत्र केलेली विद्युत रोषणाई, घराघरांतून दरवळणारा फराळाचा हवाहवासा वाटणारा सुगंध… सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते.

मी आरामखुर्चीत बसून कालचा वर्तमानपत्र वाचण्याचा प्रयत्न करत होतो. मुख्यमंत्री यांनी जनतेला दिलेल्या दिवाळीच्या शुभेच्छा वाचत असतानाच अचानक खिडकीतून माझे लक्ष बाहेर गेले.

सात-आठ वर्षांचा एक मुलगा फाटकी बनियन आणि ढिली झालेली फाटकी चड्डी हाताने सावरत, शोधक नजरेने इकडे-तिकडे फिरताना दिसला. आकाश, मयुरी आणि मृणाली ही माझी तिन्ही मुले बाहेर फटाके वाजवत होती. त्यांच्याकडून न फुटलेला फटाका तो मुलगा पटकन उचलून आपल्या खिशात ठेवत होता.

हे दृश्य पाहून माझे मन अस्वस्थ झाले आणि… आणि मन भूतकाळात जाऊन धडकले.

आज मी माझ्या संसारात सुखासमाधानाने जीवन जगत असलो, तरी माझे बालपण अत्यंत गरिबीत गेले होते. मीसुद्धा लहानपणी दिवाळीच्या दिवसांत असाच दारोदारी फिरून न फुटलेले फटाके गोळा करायचो. त्या फटाक्यांमधील दारू एकत्र करून झोपडीसमोर पेटवायचो आणि त्यातून निर्माण होणाऱ्या उजेडात टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करायचो.

वडील नेहमी आजारी असायचे. आई धुणीभांडी करून कसाबसा संसाराचा गाडा पुढे नेत असे. दिवाळीला आम्हाला नवीन कपडे कधीच मिळत नसत. कुणीतरी दिलेले जुने, फाटके किंवा अंगाला अतिशय घट्ट बसणारे कपडे मी घालायचो. दिवाळीच्या दिवसांत आई धुणीभांडी करून घरी येताना कुणाकडून मिळालेल्या फराळाच्या वस्तू घेऊन यायची. मी आणि माझ्या दोन्ही बहिणी मंगल व रंजना त्या फराळावर मनसोक्त ताव मारायचो.

सगळे सगळे डोळ्यांसमोर उभे राहिले.

मी घराबाहेर आलो आणि त्या मुलाला विचारले,

“कुठे राहतोस?”

तो घाबरतच म्हणाला, “त्या तिकडे झोपड्यांमध्ये…”

मी कपाटातून थोडे फटाके काढून त्याला दिले. माझी पत्नी नंदा हिनेही काहीही न बोलता घरातून फराळाची एक पिशवी आणून त्या मुलाच्या हातात दिली.

पण… तो माझ्याकडे पाहून घाबरत म्हणाला,

“नगं नगं… माय मारलं मला, हे कशाला आणलं म्हणून!”

मी त्याला समजावून सांगितले, “नाही मारणार. घरी सांग, एका मामाने दिले आहे.”

तो मुलगा निघून गेला.

मी हात उंचावून त्याला आशीर्वाद दिला,

“पोरा, गरिबी फार फार वाईट असते रे! बाळा, खूप खूप मोठा हो…”

मुले आणि पत्नी आपापल्या विश्वात मग्न होते. माझ्या मुलांना गरिबी काय असते, याची जाणीवच नव्हती. तो मुलगा माझ्या तरळणाऱ्या अश्रूंमधून हळूहळू दूर जात होता.

मी माझे अश्रू लपवत मुलांकडे पाहिले. माझ्या डोळ्यांतील अश्रू त्यांना दिसू नयेत, याची काळजी घेतली.

— भारत कवितके, मुंबई (कांदिवली पश्चिम)
संपर्क : ८६५२३०५७००

Ad 1
Tags: Bharat kavitake
Previous Post

चिमुकल्याच्या न्यायासाठी चिमुकल्याचीच धडपड; हातात मोबाईल घेत बनला बालपत्रकार!

Related Posts

चिमुकल्याच्या न्यायासाठी चिमुकल्याचीच धडपड; हातात मोबाईल घेत बनला बालपत्रकार!
ताज्या घडामोडी

चिमुकल्याच्या न्यायासाठी चिमुकल्याचीच धडपड; हातात मोबाईल घेत बनला बालपत्रकार!

November 5, 2026
9
ताज्या घडामोडी

‘आयडॉल शिक्षक’ निवडीत उमरखेडची बाजी; तालुक्यातील तब्बल २८ शिक्षकांचा समावेश!

November 5, 2026
12
संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!
ताज्या घडामोडी

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

November 3, 2026
16
मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा
ताज्या घडामोडी

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा

November 3, 2026
25
पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर
ताज्या घडामोडी

पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

November 3, 2026
51
कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

November 1, 2026
11

ताज्या बातम्या

दिवाळीचा फटाका…

November 5, 2026
चिमुकल्याच्या न्यायासाठी चिमुकल्याचीच धडपड; हातात मोबाईल घेत बनला बालपत्रकार!

चिमुकल्याच्या न्यायासाठी चिमुकल्याचीच धडपड; हातात मोबाईल घेत बनला बालपत्रकार!

November 5, 2026

‘आयडॉल शिक्षक’ निवडीत उमरखेडची बाजी; तालुक्यातील तब्बल २८ शिक्षकांचा समावेश!

November 5, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In