• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोकुळ दूध संघाच्या निर्णयाविरोधात सिल्लोडमध्ये काँग्रेसचा एल्गार; तहसीलदारांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 10, 2026
in Blog
0
गोकुळ दूध संघाच्या निर्णयाविरोधात सिल्लोडमध्ये काँग्रेसचा एल्गार; तहसीलदारांना निवेदन
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

शासन नियुक्त पाच संचालकांच्या अध्यादेशाला विरोध; निर्णय मागे न घेतल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांसह आंदोलनाचा इशारा

सिल्लोड प्रतिनिधी : कोल्हापूर येथील गोकुळ दूध उत्पादक संघावर शासन नियुक्त संचालक नेमण्याच्या निर्णयाविरोधात सिल्लोडमध्ये काँग्रेस कार्यकर्ते, दूध उत्पादक शेतकरी आणि दूध व्यावसायिकांनी निषेध व्यक्त केला. या निर्णयाचा निषेध नोंदवत शासनाने संबंधित अध्यादेश तातडीने मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.

RelatedPosts

पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!

एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – सुजित झावरें

हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

निवेदनात नमूद केल्यानुसार, गोकुळ दूध संघ ही कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टातून उभी राहिलेली सहकारी संस्था आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीने या संस्थेची उभारणी केली असून, गेल्या पंचवीस वर्षांपासून लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या संचालक मंडळामार्फत संस्थेचा कारभार सुरू आहे. नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीच्या पॅनेलला स्पष्ट बहुमत दिल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

मात्र, निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी सरकारने सहकार कायद्यात दुरुस्ती करून गोकुळ दूध संघावर मागील दाराने शासन नियुक्त पाच संचालक नेमण्याचा अधिकार मिळविण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. हा निर्णय सहकार क्षेत्रातील लोकशाही मूल्यांना बाधा आणणारा असून, लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मताचा अवमान करणारा असल्याची भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या

शासन नियुक्त संचालकांबाबतचा अध्यादेश तात्काळ मागे घेण्यात यावा, सहकारी संस्थांची लोकशाही स्वायत्तता कायम ठेवण्यात यावी, सहकारी संस्थांमधील राजकीय हस्तक्षेप थांबवावा तसेच लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या संचालकांच्या अधिकारांवर गदा आणू नये, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

संबंधित निर्णय रद्द न झाल्यास सिल्लोड शहर व तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि दूध उत्पादक शेतकरी आपल्या पशुधनासह रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

यांची होती उपस्थिती

यावेळी शेख फिरोज अकबर, मंगेश कळम, ॲड. लिंगायत, देवीदास दांडगे, अशपाक पठाण, गणेश आरके, गोस खा पठाण, गौतम आरके, प्रवीण जाधव, संतोष कळम यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

श्रीगोंदा-मांडवगण रस्त्याच्या संथ कामाविरोधात १६ नोव्हेंबरला ठिय्या आंदोलन; प्रशासनाला इशारा

Related Posts

पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!
Blog

पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!

November 10, 2026
7
एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – सुजित झावरें
Blog

एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – सुजित झावरें

November 10, 2026
2
हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न
Blog

हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

November 10, 2026
7
कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!
Blog

कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!

November 10, 2026
16
सह्याद्रीच्या साक्षीने भरणार पर्यावरण संवर्धनाचा राज्यव्यापी जागर!
Blog

सह्याद्रीच्या साक्षीने भरणार पर्यावरण संवर्धनाचा राज्यव्यापी जागर!

November 10, 2026
19
आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
Blog

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

November 7, 2026
61

ताज्या बातम्या

गोकुळ दूध संघाच्या निर्णयाविरोधात सिल्लोडमध्ये काँग्रेसचा एल्गार; तहसीलदारांना निवेदन

गोकुळ दूध संघाच्या निर्णयाविरोधात सिल्लोडमध्ये काँग्रेसचा एल्गार; तहसीलदारांना निवेदन

November 10, 2026
श्रीगोंदा-मांडवगण रस्त्याच्या संथ कामाविरोधात १६ नोव्हेंबरला ठिय्या आंदोलन; प्रशासनाला इशारा

श्रीगोंदा-मांडवगण रस्त्याच्या संथ कामाविरोधात १६ नोव्हेंबरला ठिय्या आंदोलन; प्रशासनाला इशारा

November 10, 2026
पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!

पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!

November 10, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In