
फुलंब्री तालुक्यातील रिधोरा देवी येथे ग्रामपंचायत तर्फे २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
गावातील महिलांना आपले आंगण स्वच्छ व आपले परिसर स्वच्छ ठेवला त्याबद्दल ग्रामपंचायत 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती निमित्त 20 ते 25 महिलांना स्वच्छ माझे आंगण अभियान प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व यावेळी सांगण्यात आले की आपले गाव व आपला परिसर स्वच्छ ठेवा .
स्वच्छता ही सेवाकचरा मुक्त भारत प्रमाणित करण्यात येते की, स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ अंतर्गत स्वच्छ माझे आंगण अभियान – २०२४ मध्ये ग्रामपंचायत रिधोरादेवी येथील गावातील महिला यांनी सक्रीय सहभाग घेवून घरात तयार होणारा घनकचरा व सांडपाण्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची सुविधा
घरात व घराच्या आवारात करुन आपले आंगण स्वच्छ व सुंदर केले. स्वच्छता क्षेत्रात केलेल्या या कार्याबद्दल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने दि.०२ ऑक्टोबर २०२४ रोजी “स्वच्छ भारत दिवसाचे” औचित्य साधून सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहे.
होळी उपस्थित सरपंच सौ अश्विनी कोलते ,ग्रामसेवक एस पी हनवते ,उपसरपंच इरफान पठाण सदस्य शरद कोलते ,अनिल देशमुख बाळू घागरे, कर्मचारी आदी गावकरी व महिला उपस्थित होते.
Discussion about this post