
फुलंब्री महावितरण कार्यालय येथे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या अंतर्गत फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज बिल भरल्याच्या पावती प्राथमिक स्वरूपात वितरित करण्यात आल्या लवकरात लवकर फुलंब्री तालुक्यातील 19184 शेतकरी बांधवांना घरपोच महावितरण कार्यालयाचे भरलेल्या वीज बिलाची पावती वितरित करण्यात येणार आहे.
.कोणालाही बिल आकारण्यात येणार नाही असे यावेळी महावितरण अधिकारी यांनी सागितले. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.
.शेतकरी हिताच्या उत्कृष्ट निर्णयाबद्दल मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवार साहेब यांनी निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी होताच शेताकरयाना मोठा दिलासा मिळाला.
हे मोफत बिल वाटप भाजप जिल्हा अध्यक्ष सुहासभाऊ शिरसाठ यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले.
.याप्रसंगी फुलंब्री सोसायटीचे चेअरमन शामराव मालोदे, भाजपा तालुका उपाध्यक्ष राम बनसोड, सुमित प्रधान, सुनील शेवाळे, भास्कर आबा कोलते, गोपीनाथ मालोदे, पंजाबराव कोलते, कार्यकारी अभियंता व्ही एस ओवळ सर, सहाय्यक अभियंता जी टि साखळे सर, सहाय्यक अभियंता एम बी पवार सर, एस एस आहिरे, ए ए सय्यद, आर जी जाधव, एस के पात्रे व शेतकरी बांधव उपस्थित होते.
Discussion about this post