• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डिंग्रजवाडी जिल्हा परिषद शाळेत सात दशकांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
डिंग्रजवाडी जिल्हा परिषद शाळेत सात दशकांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

जुन्या आठवणींना उजाळा; शाळेत एआय, रोबोटिक्स लॅब उभारण्याचा माजी विद्यार्थ्यांचा संकल्प

पुणे, दि. १४ नोव्हेंबर

RelatedPosts

पशुवर्धन पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक लिंबेकर यांचा सत्कार

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

बदलत्या काळानुसार पिढ्या बदलल्या, अनेकांचे केस पांढरे झाले; मात्र शाळेच्या आठवणींचा गोडवा आजही कायम आहे. ज्या वर्गखोल्यांमध्ये आयुष्याचा श्रीगणेशा झाला, त्याच शाळेच्या अंगणात तब्बल सात दशकांनंतर बालपणीचे मित्र पुन्हा एकत्र आले. डिंग्रजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.

मुख्याध्यापक छगन कुताळ, सहशिक्षक सूर्यकांत काळे, जयश्री वाळके मॅडम, भालेराव मॅडम, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे १९५४ ते १९५७ या कालावधीत पहिल्या वर्गात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती. वयाची ८५ वर्षे ओलांडलेले सुखदेव गव्हाणे, मल्हारी गव्हाणे, आबासाहेब गव्हाणे आणि खंडूअण्णा गव्हाणे यांनी उत्साहाने सहभाग घेतला. अनेक वर्षांनंतर जुन्या मित्रांची भेट झाल्याने उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

या स्नेहमेळाव्याला आजी-माजी शिक्षक मुख्याध्यापक तुळशीराम गोकुळे, टेमगिरे गुरुजी, भंडारी गुरुजी, लोंढे गुरुजी, मायने मॅडम आणि गोकुळे मॅडम उपस्थित होते. या शाळेने अनेक पिढ्या घडवून नोकरदार, अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक आणि समाजसेवकांची मोठी फळी निर्माण केली, याचा प्रत्यय या भेटीतून आला.

नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील आणि देशातील विविध शहरांत स्थायिक झालेले अनेक माजी विद्यार्थी दिवाळीनिमित्त गावी आले होते. त्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मात्र, हा मेळावा केवळ आठवणींमध्ये रमण्यापुरता मर्यादित न ठेवता शाळेच्या भविष्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरला. गावातील पुढील पिढीला आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) लॅब, रोबोटिक्स लॅब, कॉन्फरन्स हॉल उभारणे, क्रीडांगण विकसित करणे आणि परिसराचे सुशोभीकरण करणे, अशा विविध योजना राबविण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी केला. लोकवर्गणी आणि परस्पर सहकार्यातून शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधांनी समृद्ध करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या संकल्पाबाबत देवदत्त कोतवाल, प्रताप गव्हाणे, विकास गव्हाणे, पोपट गव्हाणे आणि खंडूअण्णा गव्हाणे यांनी आपल्या मनोगतातून विचार मांडले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजक, व्यावसायिक आणि समाजसेवी माजी विद्यार्थ्यांचा मेडल, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

सूर्यकांत काळे यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक छगन कुताळ यांनी मनोगत व्यक्त केले. जयश्री वाळके यांनी उपस्थित मान्यवर, माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, शालेय समिती आणि आयोजकांचे आभार मानले. शाळेची घंटा वाजल्यानंतर जुन्या आठवणी आणि नव्या संकल्पांची शिदोरी घेऊन हा स्नेहमेळावा संपन्न झाला.

Ad 1
Tags: Jogendra Jadhav
Previous Post

धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम

Related Posts

पशुवर्धन पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक लिंबेकर यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

पशुवर्धन पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक लिंबेकर यांचा सत्कार

November 15, 2026
9
केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
ताज्या घडामोडी

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

November 15, 2026
2
सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती
ताज्या घडामोडी

सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

November 15, 2026
5
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी
ताज्या घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

November 15, 2026
3
ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे; सरपंच अशोक आमटे यांचे आवाहन
ताज्या घडामोडी

ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे; सरपंच अशोक आमटे यांचे आवाहन

November 15, 2026
1
राजापूर बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर; २१ लोखंडी बर्गे चोरीला
ताज्या घडामोडी

राजापूर बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर; २१ लोखंडी बर्गे चोरीला

November 14, 2026
18

ताज्या बातम्या

डिंग्रजवाडी जिल्हा परिषद शाळेत सात दशकांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

डिंग्रजवाडी जिल्हा परिषद शाळेत सात दशकांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

November 15, 2026
धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम

धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम

November 15, 2026
पशुवर्धन पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक लिंबेकर यांचा सत्कार

पशुवर्धन पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक लिंबेकर यांचा सत्कार

November 15, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In