भव्य मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थिती
सावंगा जहागीर / प्रतिनिधी : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सावंगा जहागीर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. यानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण करून आदिवासी समाजाच्या परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वाशिमचे आमदार श्याम भाऊ खोडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ चौधरी आणि काँग्रेस कमिटीचे वाशिम जिल्हाध्यक्ष राजू भाऊ चौधरी उपस्थित होते.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, वाशिमचे युवा जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण चोंडकर, अखिल भारतीय आदिवासी विकास विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अविनाश भाऊ पधारे, समाधान मोघाडे (महाराष्ट्र पोलीस), तलाठी महादेव डाखोरे, भगवान तिवाले (महाराष्ट्र पोलीस), महादेव आगलावे (महाराष्ट्र पोलीस), संदीप डाखोरे (महाराष्ट्र पोलीस), ग्रामपंचायत सदस्य दीपक आगलावे, तंटामुक्ती अध्यक्ष सुदाम गोदमले, विठ्ठल आनंद गायकवाड, बजरंग डाखोरे, विठ्ठल सुखदेव गायकवाड, महादेव अमृता गोदमले, नंदू पांडे, गजानन गोदमले, साहेबराव डाखोरे, रामकृष्ण गायकवाड, नामदेव डाखोरे आणि विठ्ठल ठोंबरे यांची उपस्थिती होती.
मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचे स्मरण करत जयंती उत्सव आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.











