शिवसेना पाचल विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयात अभिवादन; शिवसैनिक व युवासैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
पाचल | दि. १७ नोव्हेंबर २०२६
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना पाचल विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांना आदरांजली अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी शिवसेना विभागप्रमुख विलास नारकर, ज्येष्ठ पत्रकार नारायण पांचाळ, विभाग संघटक अनंत कोलते, दिवाळवाडी शाखाप्रमुख राजेश (पप्पा) सुतार, पाचल रिक्षा संघटनेचे अध्यक्ष जयंत धावडे, उपविभागप्रमुख नितेश सावंत, राजापूर उपतालुका अधिकारी ओंकार नारकर, पाचल रिक्षा संघटनेचे सचिव विलास जाधव, पाचल युवासेना उपविभाग अधिकारी मनोज श्रीकृष्ण सार्दळ, कट्टर शिवसैनिक प्रवीण नारकर, पप्पू सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या कार्याचा आणि स्मृतींचा उजाळा देत उपस्थितांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
शिवसेना पाचल विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिवसैनिक आणि युवासैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.










