गेवराई तालुका : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून विजय दशमीच्या निमित्ताने प्रत्येक पक्षाचा किंवा संघटनेचा दसरा मेळावा आयोजित होत आहे परंतु यावर्षी शेतकऱ्याच्य दीनदुबळ्या व कष्टकरी गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी मराठा समाजाचा व अठरापगड सर्व जाती धर्मासाठी नारायणगड येथे भव्य दिव्य असे दसरा मेळाव्याचे आयोजन सुरू आहे या अनुषंगाने नारायण गड परिसरात सर्व येणाऱ्या लोकांचे गैरसोय होऊ नये यामुळे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आदेशावरून
सर्व गोष्टीची बारकाईने लक्ष देऊन तयारी चालू आहे जेणेकरून येणाऱ्या बांधवांची पार्किंगची व्यवस्था किंवा राहण्यापासून ते जेवण्यापासून सर्व गोष्टीची व्यवस्था मोठ्या प्रमाणात होत आहे दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी असे हजारो हात राबत आहेत बाहेरून येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही त्यांच्या पायात काटा देखील टोचणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे एवढे ऊन डोक्यावर घेऊन हजारो हात येथे झटत आहेत एवढेच नव्हे तर तरुणा बरोबर वयोवृद्ध ची सुद्धा उपस्थिती लक्षणीय आहे
झटणारे हाताला आलेल्या फोडाचा शेवट तेव्हाच गोड होईल जेव्हा येते लाखो भाविक व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहील त्यामुळे येणाऱ्या 12 तारखेला नारायणगड येथे आपण सर्वांनी आपल्या कुटुंबाबरोबर व आपल्या मित्रपरिवार बरोबर मोठ्या संख्येने उपस्थित राहून या होऊ घातलेल्या दसऱ्या मेळाव्याची शोभा वाढवावी व संघर्ष युद्ध मनोज दादा तरंगे पाटील यांचे हात बळकट करावे असे मराठा बांधव सामाजिक कार्यकर्ता किरण डावकर यांनी सर्व बांधवांना आवाहन केलं आहे
Discussion about this post