
पिंपळवंडी दि. ८ (प्रतिनिधी)- पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील रहिवाशी व सेवानिवृत्त शिक्षक भगवान आण्णा वाघमारे यांचे वृद्धापणात अल्पशा आजाराने रविवार दि.६ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री उपचारादरम्यान खाजगी दवाखान्यात वयाच्या ८२ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांच्या जाण्याने पिंपळवंडी सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अत्यंत शांत, मनमिळाव स्वभाव व धार्मिक वृत्ती यामुळे ते सर्व परिचित होते त्यांच्या पार्थिवावर बीड-नगर रोड लगत नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत सोमवार रोजी सकाळी ११ वा. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी जि.प. सदस्यपती तसेच आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, अंमळनेर-पिंपळवंडी केंद्रातील आजी-माजी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आदिसह नातेवाईक, पत्रकार, राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित तीन मुले अशोक तसेच माजी ग्रा.पं. सदस्य नरहरी, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष राजेंद्र तसेच एक विवाहित मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वाघमारे कुटुंबीयांच्या दुःखात सारथी परिवार सहभागी आहे.
Discussion about this post