
प्रतिनिधी: सुधीर घाटाळ
9834756487
दि. ०७ ऑक्टों.रोजी मा.महामहिम राज्यपाल श्री.सी.पी.राधाकृष्णन साहेब. महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा जव्हार दौऱ्यावर आले असताना वरील निवेदन देतांना.शूर झलकारी कातकरी एकता महासंघ महाराष्ट्र राज्य. संस्थापक अध्यक्ष. माननीय श्री. रमेशजी सवरा साहेब. आदिम कातकरी जमातीचा विकास करण्यासाठी उपाय योजना करणे बाबत. तसेच विविध विषयावर चर्चा करून. एक जिल्हा एक योजना राबवण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून शेळी पालन हा व्यवसाय मंजूर होणे बाबत.

तसेच आदिम कातकरी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व नसल्याने माननीय राज्यपाल स्वीकृत १२ आमदारां पैकी एक आमदार कातकरी समाजाचा असावा. राज्य ते तालुका पातळी पर्यंत ज्या एसटी कमिट्या मध्ये एक एक प्रतिनिधी समाविष्ट करणे. अनुसूचित जमातीला दिलेल्या राजकीय, शैक्षणिक व नोकरी यामध्ये दिलेल्या आरक्षणा पैकी एक ते दोन टक्के आरक्षण आदिम जमातीस असावे. महाराष्ट्राच्या पंचवार्षिक (अनुसूचित जमातीच्या) बजेट पैकी दोन टक्के बजेट आदिम जमातीसाठी खर्च करावा. अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.आदिम कातकरी समाजासाठी विविध योजना विषयी चर्चा करण्यात आली.

माननीय संस्थापक अध्यक्ष श्री. रमेश जी सवरा साहेब यांच्या समवेत शूर झलकारी कातकरी एकता महासंघाचे सचिव माननीय श्री.शांताराम ठेमका.उपाध्यक्ष श्री सिलिंद लहांगे.तसेच पालघर जिल्हा अध्यक्ष श्री. विजय शिसव साहेब.व डहाणू तालुका अध्यक्ष.मा.श्री. गणेश गावित. तसेच राज्याचे सहसचिव मा.श्री. विलास भोये,डहाणू तालुका सहसचिव.मा.श्री. दिलीप पवार,सल्लागार मा.श्री. देऊ गावित, उपाध्यक्ष मा.श्री. काळूराम घाटाळ. राज्य कार्यकारणी सदस्य मा.श्री. मनोज जाधव. उपस्थित होते.

Discussion about this post