……
………………………………………………………………।
जुळेवाडी चे एक सुंदर, निसर्ग हिरवळी खेडे
तिथे जन्मले माय मराठीचे, शब्द खुळाचे वेढे
मराठी माती पवित्रतेची, जगी श्रेष्ठ श्री संत ज्ञानाचे
जनी तन मनी घुमविले, शब्द साहित्याचे चौघडे…।…
वाटचालता कष्ट गरिबी, अल्पच शिक्षण घडले
परी मात्र पित्याचे सुज्ञान, नित्य अंतरंगी सामावले
सुंदर अक्षर भाव सात्विक, जीवनशैली लेखणीतूनी
सत्य ग्रामीण जीवनाचे, व्यक्ती दर्शन घडविले..।।…
कथा कादंबरी अन् नाटके, जन मनी प्रबोधन ठरली
अनेक पुरस्कारांनिया, लेखणी भाग्यवंत झाली
विकृती सोडून संस्कृती घडवा, शब्द ज्ञान ठेवा रुजवूनी
सत्यनीती सुविचाराची, शब्दगंधांनी फुले उमलली…।।।…
शतायुष्य लाभो तयांना, सेवा रुजाया माय मराठीची
शब्द साहित्याचा हा मोगरा, अमृतवाणी श्री संतांची
अभंग वाणी सुस्वरे गाऊ, साहित्यप्रेमी मिळवूनी
मराठीच एक माय माऊली, आद्य जनीता सर्वे विश्वाची
…………।।।।…….
काव्यरचना, कवी हरिभाऊ पुदाले.
,,, अग्निरथ सेवेतील ज्येष्ठ साहित्यिक, दत्तात्रय मानगुडे या संदर्भ ग्रंथासाठी काही कविता आल्या आहेत. त्यापैकी,, दिवाळीचा लाडू,, कवी नामदेव जाधव
,, साहित्य शिरोमणी,, हरिभाऊ पुदाले.
,, पोवाडा,, शाहीर बजरंग आंबी.
,, साहित्याचा प्रवास,, कवी काकासाहेब देशमुख
,, शुभचिंतन,, कवी रामचंद्र गलांडे
अशा कविता संदर्भ ग्रंथासाठी आलेल्या आहेत या सर्व कविता संदर्भ ग्रंथांमध्ये प्रकाशित होणार आहेत. संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे..
.. शब्दांकन, प्राध्यापक विठ्ठल सदामते..।
Discussion about this post