*पुणे जिल्ह्यातील सरकारी अनुदानावरील दिव्यांग शाळा कर्मशाळा मध्ये रिक्त झालेल्या पदावर नोकरीवर दिव्यांग व्यक्तीचीच पद नियुक्ती नोकरी देण्यात यावी धर्मेंद्र सातव* .पुणे जिल्ह्यातील सरकारी अनुदानावर चालू असलेल्या दिव्यांगांच्या शाळेमध्ये सेवानिवृत्त. मयत. स्वेच्छानिवृत्ती इतर कारणामुळे रिक्त झालेल्या जागावर पद नियुक्ती भरती सुरू आहे.
*संस्थाचालक दिव्यांग शाळेचे समाज कल्याण अधिकारी व इतर संबंधित कार्यालयाला प्रशासनाला हाताशी धरून आपल्याच मर्जीतील धडधाकड पंधरा ते वीस लाख रुपये घेऊन नोकरीला लावत आहे*.
या विरोधात धर्मेंद्र सातव पाटील यांचे नेतृत्वाखाली अनिता कदम सुप्रिया लोखंडे बाळासाहेब काळभोर यांनी *दिव्यांग कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य प्रवीण पुरी यांना लेखी निवेदनाद्वारे दिव्यांग शाळेमध्ये दिव्याग व्यक्तींना नोकरी देण्यात यावी.अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरून दिव्यांग बांधव आंदोलन करतील असा इशारा दिला अशी लेखी मागणी केली*
Discussion about this post