आजरा – तालुका प्रतिनिधी,
आजरा हायस्कूल, आजरा येथील इंग्रजी विषयाचे तज्ञ शिक्षक म्हणून ज्यांची ख्याती आहे. असे अष्टपैलू नेतृत्व म्हणजे के – म्हणजे कतृत्व, के म्हणजे – कशात कमी नाही अशा या व्यक्तीला पुरस्कार मिळणे म्हणजे ब्रह्मचैतन्य योग म्हणावा लागेल कारण, विद्यार्थी व पालक यांच्या मधील दुवा म्हणजे के.के.सर याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे त्यांनी केलेले काम, विद्यार्थी यांची घरची परिस्थिती, आर्थिक भार याची सखोल चौकशीअंती पुढील शिक्षणाची दिशा ठरवून देणारे दुसरे शाहु महाराज म्हटलेतर वावगे ठरणार नाही.
कारण कोरोणा काळात काही पालकांचे व्यवसाय बुडाले आर्थिक कोंडी झाली. मुलींची लग्न ठरली पण पैसा नाही अशावेळी मदत करणारे एकमेव व्यक्ती,आजारी मुलींना औषधे,व हॉस्टेलच्या मुलांना मोफत केस कटींग करून शिस्त व निटनेटकेपणा, व आपले वाढदिवसाच्या व कुटूंबातील मिळालेल्या शैक्षणिक भेट वस्तू मुलांना वाटप करणे, दिपावलीचा आनंद मुलांना कपडे देण्यात तर दहावी पेपर तपासणी मानधन, निवडणूक मानधन, याचा उपयोग हॉस्टेलच्या मुलांसाठी दिले.
याची दखल घेवून स्व. राजे विक्रमसिंह घाटगे फौडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळले बदद्ल आजरा हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक, श्री. एस. पी. होलमसर, उपमुख्याध्यापक, श्री. तोडकर सर, पर्यवेक्षिका सौ. कामत मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेचे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते.
Discussion about this post