
देसाईगंज तालुक्यापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर आमगांव बुट्टी एक प्रसिद्ध ऐतिहासिक गांव आहे.या गावात सर्व जाती धर्माचे समाजबांधव एकोप्याने राहतात. सर्वजण पारंपारिक सण एकत्र मिळून साजरे करतात या गावात प्राचीन काळापासून नावाजलेले राम मंदिर अस्तित्वात आहे. मंदिराच्या स्थापनेपासून अर्जुनी /मोरगांव येथील पालीवाल कुटुंबियांचे हे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात राम, लक्ष्मण, सीता,हनुमान तसेच माता दुर्गा ची मूर्ती स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी रामनवमीला मोठी जत्रा या ठिकाणी भरते. हजारोंच्या संख्येने श्रद्धालू दर्शन घेण्यासाठी येत असतात. या ठिकाणी अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात.या मंदिरात हाईमास्ट लाईट लावणे, तसेच आकर्षक गार्डन तयार करून आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून सुशोभीकरण केले तर देश विदेशातील पर्यटक सुद्धा या ठिकाणी आवर्जून भेट घेऊ शकतात.त्यांना मुक्काम करण्यासाठी गेस्ट हाऊस तयार करून सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. जर राम मंदिर परिसराला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्यास अयोध्या राम मंदिरा सारखी प्रसिद्धी मिळून जिल्ह्याचे नक्कीच नावलौकिक होईल तेव्हा आमगांव बुट्टी येथील राम मंदिराचे सौन्दर्यकरण करून पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी. *आरमोरी विधानसभा क्षेत्राचे तत्पर जागरूक युवा उमेदवार.* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खेमराज वातुजी नेवारे देसाईगंज जि. गडचिरोली 📱9325969029
Discussion about this post