सर रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगजगतातील आधारवड हरपला, तर सामाजिक संवेदना काळाच्या पडद्याआड गेलीये…..- भरत गोंधळे
कल्याण – प्रफुल्ल शेवाळे
मुंबई च्या ब्रिच कॅंडी रुग्णालयात टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी काल दि. ९ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला…. आणि उद्योग जगतातील बलाढ्य आधारवड कायमचा हरवला. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत गोंधळे यांनी सर रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सर रतन टाटा यांच्या निधनाची बातमी हृदयाला आघात करणारी आहे. त्यांनी भारताच्या औद्योगिक क्षेत्राला जे योगदान दिलं, ते शब्दांपलीकडचं आहे, परंतु त्यांच्या शांत, विनम्र व्यक्तिमत्त्वाने त्यांनी असंख्य लोकांच्या मनात प्रेम आणि सन्मान मिळवला.
त्यांच्या ध्येयवादी विचारसरणीने आणि समर्पणाने त्यांनी उभं केलेलं प्रत्येक पाऊल समाजाच्या कल्याणासाठी होते . केवळ एक महान उद्योजक म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील, माणुसकीचा आदर्श दाखवणारा माणूस म्हणून त्यांना कधीही विसरता येणार नाही. त्यांची असलेली जागा रिकामी होणं अशक्य आहे.साहजिकच टाटा यांच्या निधनाने एक सामाजिक संवेदना काळाच्या पडद्याआड गेलीये असंच म्हणावं लागेल… असं भरत गोंधळे यांनी आपल्या प्रतिक्रिये मध्ये म्हटलं आहे.
Discussion about this post