दाणवीर उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधनदेशातील प्रसिद्ध उद्योगपती व दानशूर व्यक्तिमत्व यांचे आज (दि.9) निधन झाले.
ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते.
देशासाठी एक आदर्श व्यक्तिमत्वाचा, शालिन उद्योगपती आपल्यातून गेला आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योगविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.
भारतीय उद्योगसमूहाचं एक प्रेमळ आणि सोज्वळ असं स्वरुप रतन टाटा यांचं होतं.रतन टाटा हे व्यक्तिमत्व जगातून हरवण म्हणजे खूप आठवण मागे ठेऊन गेलं .
एक दाणवीर जगातून हरवला आहे.असा दानशूर पुन्हा होणे नाही.रतन टाटा ला भावपूर्ण श्रद्धांजली.
Discussion about this post