सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी.
किर्लोस्करवाडी रामानंदनगर येथे कामगार भवन मध्ये ह.भ.प. विजय रामचंद्र ताटे यांच्या 48 व्या व ऋणानुबंध कविता प्रकाशन समारंभामध्ये अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण कथा लेखक दत्तात्रय मानुगडे बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी गौतम कांबळे कवी नामदेव जाधव ऋषिकेश खारगे ज्येष्ठ कवी सुभाष कवडे तर दीप प्रज्वलन ब्रह्मानंद हायस्कूलचे मुख्याध्यापक ग्रामीण कथा लेखक रविराज माने व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. प्रतिमा पूजन प्रल्हाद जाधव प्रमोद झेंडे यांच्या हस्ते झाले.
अध्यक्ष ही भाषणामध्ये बानुगडे पुढे म्हणाले. कथा कादंबरी पेक्षा अध्यात्मिक विषयाच्या कविता आज समाजापुढे येत आहेत ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. शिवाय अध्यात्म हा विषय अतिशय अवघड व किचकट असा आहे. ह भ प विजय रामचंद्र ताटे यांनी कुणाानुबंध या कवितासंग्रहामध्ये आई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सिंधुताई सपकाळ कामगार साहित्य संमेलन सद्गुरु भारत माता विजय दशमी सुरक्षेची साधने अशा सुंदर कविता या पुस्तकामध्ये लेखकाने समाविष्ट करण्याचा अतिशय उत्कृष्ट प्रयत्न केला आहे.
प्रत्येक माणूस दुःखातून पुढे जात असतो काहीजण आई-वडिलांना काही लोक वृद्धाश्रमामध्ये पाठवतात परंतु विजय ताटे यांनी हा कवितासंग्रह आई-वडिलांना अर्पण केला आहे ही फार मोठी जमेची बाजू आहे. आज आपण महाराष्ट्र मध्ये मोठमोठ्या साहित्यिकांच्या कलाकारांच्या जयंती साजरा करतो याचा अर्थ असा की या कलाकारांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे.
प्रत्येकाने कष्टातूनच साहित्यनिर्मिती कलाकार जीवन मिठीत केले आहे म्हणूनच ही मंडळी आज मोठी झाली आहे हे नाकारता येत नाही. खुल्या काव्यसंमेलनामध्ये 15 कवी ना पुस्तक फुल आणि प्रमाणपत्र देऊन कवींचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम सकाळी साडेदहा वाजता चालू झाला व दुपारी अडीच वाजता या कार्यक्रमाची सांगता झाली.
व्यासपीठावरील मान्यवरांचे भाषण झाले. आभार ह भ प विजय रामचंद्र ताटे यांनी मानले. यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मित्र परिवार किर्लोस्कर कामगार युनियनचे मगर नाना पाटील त्याचप्रमाणे थोर व्याख्यानकार सर्जेराव खरात यांचा प्रामुख्याने समावेश होता. दुपारच्या सत्रामध्ये ह भ प विजय रामचंद्र ताटे यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत गीत रजनी हा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता झाली..।
Discussion about this post