दिंडोरी तालुक्यातील
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या कडे दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव तिल्लोळी वाघाड व इतर काही गावांचे फसवणुक झालेले काही शेतकरी गेले होते घडलेला प्रकार सर्व जितेंद्र भावे यांना सांगितले व त्याचा तपास निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित यांच्या कडे दिला त्या नंतर नामदेव गावित यांनी आरोपी घरी जाऊन समजून सांगितले तरी आरोपी उडवा उडवीचे उत्तर देत होते.
मात्र जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित यांनी त्यांच्या पुर्ण पिछा करून दिंडोरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्याशी सस्वितर चर्चेत
आरोपींनी शेतकऱ्यांना तुमच्या नावावर कर्ज प्रकरण करून ट्रॅक्टर खरेदी करतो व तुमचा ट्रॅक्टर आमच्या कंपनीत कामाला लावून तुम्हाला दरमहा ट्रॅक्टर भाड्यापोटी पाच हजार रुपये मिळतील व ट्रॅक्टरचे हप्ते आमची कंपनी भरेल असे सांगून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली आहे अशी सस्वितर चर्चा केली व त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपासपोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांचे मार्गदर्शनाखाली तपास आधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख यांनी करून तत्काळ चार आरोपींना अटक केली त्यांच्याकडून 11 ट्रॅक्टर एकूण 55 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव मॅडम, पोलीस उपनिरीक्षक आवारी, पोलीस हवालदार कनोज, पोलीस अंमलदार अविनाश आहेर, विशाल पैठणकर, अनिता ठाकरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
Discussion about this post