प्रतिनिधी शिरूर अनंतपाळ. शिरूर
अनंतपाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्नाटक राज्य सीमा पार करून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध घातलेला गुटखा व पान मसाला व सुगंधी पान मसाल्यावर बंदी असूनही स्वतःच्या फायद्यासाठी चोरट्या मार्गाने अनेक जण वलांडी, जवळगा, साकोळ, तळेगाव, पांढरवाडी, येरोळमोड व शिरूर अनंतपाळहून उदगीर, लातूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा घेऊन जात असल्यामुळे शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठलराव यांच्या मार्गदर्शना खाली पथके नेमून या ठिकाणी वाहनांची कसुन तपासणी केली जात आहे .
त्यात दि.१३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान पांढरवाडी ते शिरूर अनंतपाळ दरम्यान असलेल्या स्मशानभूमि नजीक कर्नाटकातुन आणुन धनेगाव लातूर येथे विक्री साठी बुलेटवर बांधुन जवळपास ३४ हजार ४०० रुपयांचा प्रतिबंधीत असलेला सुगंधी पान मसाला,
गुटखा घेऊन जात असताना पोलिसांनी सापळा रचून पकडला यासंदर्भात शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरूर अनंतपाळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी कि, दि १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सांयकाळी ६ च्या दरम्यान कर्नाटकातून वलांडी मार्गे साकोळ शिरूर अनंतपाळहून धनेगाव ता.जि.लातूर येथे विक्री साठी आरोपी बालाजी व्यंकट कुटवाडे रा. धनेगाव तालुका जिल्हा लातूर हा आपल्या रॉयल इनफिल्ड बुलेट एम. एच. २४ बी व्ही ४८६९ ज्याचा आरटीओ पासिंग नंबर असलेल्या लाल रंगाच्या बुलेटवर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अन्नपदर्थ हा मानवी जिवीतास धोकादायक असल्याचे माहित असताना सुद्धा सुगंधी पान मसाला, रजनीगंधा,विमल पान मसाला, बाबा ब्लॅक डीलक्स तंबाखू, सुगंधित तंबाखू अशा जवळपास ३४ हजार ४०० रुपयांचा गुटखा चोरून गाडीवर बांधून घेऊन जात असताना पोलिसांच्या पथकाने तपासनी दरम्यान पकडला. ज्याची किंमत रजनी गंधा ८४०० रुपये, बाबा ब्लॅक डिलक्स जुनिंग टोबंको ३२०० रुपये,
विमल पान मसाला १८००० हजार रुपये, सुगंधी तंबाखु ४८०० रुपये अशा एकूण ३४ हजार ४०० रुपये व गाडीची किंमत १ लाख १०००० हजार अशा एकूण १ लाख ४४ हजार ४०० रुपयेचा माल जप्त करून फिर्यादी गौतम दशरथ घाडगे पो.ह.का च्या फिर्यादी वरून आरोपी बालाजी व्यंकट कुटवाडे यांच्या विरुद्ध भाग १ ते ५ गुन्हा रजि. नं २/४/२४ कलम १२३, २२३, २७४, २७५ बी एन सी अन्न सुरक्षा आणि मानके अधि नियम २००६ कलम ५९ नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठलराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस
उपनिरक्षक गजानन अन्सापुरे करीत आहेत.
चौकट :- पोलीस कारवाई च्या धास्तीने
ढाब्यावर अवैध दारू विक्री बंद, व पानटपऱ्या वर गुटखा विक्री बंद केल्याचे दिसून येत आहे. पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांनी चोरट्या मार्गाने विक्री होणाऱ्या अवैध देशी दारु व प्रतिबंधीत असलेला गुटखा पान मसला याला लगाम घालण्या साठी चांगलीच कंबर कसली आहे. अवैध दारू व गुटखा विक्री वर पोलीसांनी करडी नजर ठेवल्यामुळे कोणताच पान टपरीवाला पोलीसांच्या कारवाईच्या भितीमुळे पान मसाला व गुटखा ठेवण्याची हिंमत करत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
Discussion about this post