भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था, नांदेड द्वारा आयोजित दहा दिवसीय दुग्ध व्यवसाय व गांढुळ खत निर्मिती प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करतांना आरसेटी चे राज्य संचालक श्री अशोक चव्हाण यांनी प्रशिक्षणार्थ्यांना आरसेटी च्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाने स्वयं पूर्ण व्हा असा संदेश दिला.
भारतीय स्टेट बँक आरसेटी च्या वतीने स्वयं रोजगार आणि कौशल्य विकास अंतर्गत दिनांक ०५ ऑक्टोबर पासून दहा दिवसीय दुग्ध व्यवसाय आणि गांढुळ खत निर्मिती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये ३१ युवक व युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, या मध्ये त्यांना दुग्ध व्यवसाय संबंधी जनावरांचे आजार, गोठा व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन, गांडूळ खत निर्मिती तसेच वैक्तीमत्व विकास, उद्योजकता विकास, आर्थिक साक्षरता, बँक व बँकेचे कार्य, खात्याचे व ठेवीचे प्रकार इत्यादी विषयी सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले, विविध मान्यवरांचे मार्गदर्शन, क्रियाकलाप, खेळ आणि अभ्यास दौरा द्वारा प्रशिक्षाणार्थ्यांमध्ये स्वयं रोजगाराचे महत्व आणि त्याकडे वळण्याकरिता प्रेरणा निर्माण करण्यात आली.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम भारतीय स्टेट बँक आरसेटी मार्फत मोफत आयोजित करण्यात आला आणि प्रशिक्षण कालावधी मध्ये प्रशिक्षणार्थ्यांची जेवणाची, निवासाची व्यवस्था सुद्धा मोफत करण्यात आली. आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी प्रशिक्षणार्थ्यांची असेसमेंट (परीक्षा) आदरणीय प्रीती पांडे, स्टेट कंट्रोलर, नॅशनल अकॅडमी, बंगलोर यांच्या मार्गदर्शनामध्ये श्री ऋषिकेश कोंडेकर, डॉ. प्रदीप साळवे यांनी आयोजित केली. प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमाला आरसेटी राज्य संचालक अशोक चवहान, भारतीय स्टेट बँक आरसेटी संचालक अशोकनाथ शर्मा, प्रशिक्षक आणि कार्यक्रम समन्वयक आशिष राऊत, साईनाथ मंचेवर, तज्ञ प्रशिक्षक पांडुरंग निळकंठे, सहाय्यक सुमेध सूर्यवंशी, स्नेहा सारंगधर, मारोती कांबळे हे उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये अशोकनाथ शर्मा, आशिष राउत, साईनाथ मंचेवार, पांडुरंग निळकंठे इत्यादींनी तज्ञ प्रशिक्षक, मार्गदर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली. भारतीय स्टेट बँक आरसेटी नांदेड द्वारा अशा अनेक स्वयंरोजगाराभिमुख कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत विविध निवासी आणि अनिवासी प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात येत असते ज्यामध्ये शिवणकाम, ब्युटी पार्लर, पापड मसाला बनविणे, कागदी आणि कापडी बॅग बनविणे, शेळी संगोपन, कुकुटपालन, मोबाईल दुरुस्ती, दुचाकी वाहन दुरुस्ती, घरगुती उपकरन दुरुस्ती इत्यादी प्रशिक्षण मोफत आयोजित केले जातात ज्या मध्ये जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा मोफत केली जाते. यासर्व प्रशिक्षणाचा ग्रामीण भागातील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील बेरोजगार युवक युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन संचालक अशोकनाथ शर्मा यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन आशिष राऊत तर कार्यक्रमाच्या यशस्वियेतेकरीता सर्व आरसेटी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post