भोकर प्रतिनिधी राजकुमार पांचाळ 9657978196
केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली असून महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांना भेट दिली होती. तेथील सर्व व्यवस्थेचा अभ्यास केला होता.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर राज्यात वाजले असून केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत. यामुळे राज्यात २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे असून २८८ जागांवर मतदान होणार आहे. यातील २३४ जागा या सर्वधाराण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी २५ आणि २९ जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेचा काळ २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. महाराष्ट्रात एकूण मतदार ९.६३ कोटी मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या ४.९७ कोटी इतकी आहे. तर ४.६६ कोटी या महिला मतदार आहे. यात २०.९९ लाख लोक हे पहिल्यांदा मतदान करणार आहे. राज्यात १ लाख १५८ मतदार निवडणूक केंद्र आहेत. यापैकी शहरी भागात ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ केंद्र आहेत.
मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार असल्याचा विश्वास राजीव कुमार यांनी व्यक्त केला आहे. सर्व पोलिंग स्टेशनवर सर्व सुविधा देण्यात येणार आहे. आम्ही रिव्ह्यू केला आहे. बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना डीओबी जाहीर करण्यात आलं आहे. ते सर्व रिसोर्स वापरतील, असं राजीव कुमार म्हणाले. रांग लावण्यात येत असलेल्या ठिकाणी खुर्ची आणि बेंच ठेवणार असून यामुळे रांगेत उभं राहणाऱ्यांना बसायला मिळेल. ज्येष्ठ लोकांचा थकवा यामुळे दूर होईल. असही ते म्हणाले.

Discussion about this post