
शिरपूर तालुक्यातील खर्दे येथील आर सी पटेल प्राथमिक शाळेत माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिवस व हात धुवा दिवस साजरा करण्यात आला.सदर वाचन प्रेरणा दिवस मुख्याध्यापिका क्रांती जाधव यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. विद्यार्थांना यानिमित्ताने वाचन प्रेरणा दिवसाचे महत्त्व सांगण्यात आले.जीवनात वाचनाचे महत्त्व किती आहे हे विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना क्रांती जाधव यांनी सोप्या भाषेत पटवून दिले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन ही केले.
तदनंतर विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रकार प्रात्यक्षिकद्वारे समजून देण्यात आले.तसेच उत्तम आरोग्यासाठी वेळोवेळी हात धुणे किती महत्वाचे असते हे सांगण्यात आले.
यावेळी उज्वला पाटील,रुपाली राजपूत, नीता एशी, रमेश शिरसाठ, अनिल माळी, विजय गुजर व पवार उपस्थित होते.
Discussion about this post